रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रक्षादंड स्थापना आणि लवणपर्वत पूजा !

सनातन संस्थेसह साधकांवर आलेली सर्वप्रकारची अरिष्टे दूर व्हावीत, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रक्षादंड स्थापना आणि लवणपर्वत पूजा !

रामनाथी (गोवा) – ‘सनातन संस्थेवर आलेली संकटे दूर व्हावीत, तसेच साधकांना होणारे सर्व प्रकारचे त्रास दूर व्हावेत’, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात ३ जून २०१९ या सोमवती अमावास्येच्या दिवशी जम्मू येथील डॉ. शिवप्रसाद रैनागुरुजी यांनी सांगितल्यानुसार रक्षादंडांची स्थापना करण्यात आली, तर भृगु महर्षींच्या आज्ञेने लवणपर्वत पूजा करण्यात आली. हे दोन्ही विधी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या विधींचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी केले. – श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.६.२०१९)

रक्षादंडांचे वैशिष्ट्य

जम्मू येथील डॉ. शिवप्रसाद रैनागुरुजी यांना मिळालेल्या ईश्‍वरी प्रेरणेनुसार त्यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पलाश, शमी आणि औदुंबर या वृक्षांचा प्रत्येकी एक याप्रमाणे तीन दंड अभिषेक करून अभिमंत्रित करून दिले होते. यांतील सर्वांत जाड असलेला पलाश वृक्षाचा दंड देवबाधा (देवबाधा म्हणजे एखाद्या व्यक्तीने देवाची उपासना करून त्याद्वारे मिळालेल्या सिद्धीचा वापर करून एखाद्याला उपद्रव (बाधा) करणे) दूर करतो. मध्यम जाड असलेला शमी वृक्षाचा दंड भूतबाधा, करणी, तंत्र-मंत्र, जारण-मारण यांसारख्या बाधा दूर करतो, तर अल्प जाड असलेला औदुंबर वृक्षाचा दंड समृद्धी आणि संपन्नता प्रदान करण्यासह रामनाथी येथील सनातन आश्रमात येणार्‍या दैवी स्पंदनांना विरोध करणार्‍या अनिष्ट शक्तींचा नाश करणारा आहे. असे या तीनही दंडांचे वैशिष्ट्य आहे.

लवणपर्वत पूजेचे वैशिष्ट्य

भृगु महर्षींनी ३ जून या दिवशी असणार्‍या सोमवती अमावास्येला हा विधी करण्यास सांगितले होते. यामध्ये १६ किलो खडे मीठ घेऊन त्याचा पर्वत (ढिग) करण्यात आला होता. समुद्रमंथनातून श्री महालक्ष्मी प्रगट झाली होती. मिठाचा ढिग म्हणजे समुद्राचे प्रतीक, तर लवणपर्वत पूजा म्हणजे साक्षात श्री महालक्ष्मीदेवीचीच पूजा होय. पूजेनंतर ४ दिवसांनी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी (७ जून २०१९ या दिवशी) पूजेत वापरलेले मीठ समुद्रात दान करण्यात आले. समुद्रामध्ये श्रीमहाविष्णूचे वास्तव्य असते. त्यामुळे लवणपर्वत पूजा केल्याने साधकांना श्रीविष्णूचा कृपाशीर्वाद लाभणार आहे.’


Multi Language |Offline reading | PDF