कनिष्ठ डॉक्टर्स ममता बॅनर्जी यांच्याशी सशर्त चर्चेला सिद्ध; मात्र संप अद्याप चालूच

कोलकाता – बंगालमध्ये कनिष्ठ डॉक्टरांना धर्मांधांकडून झालेल्या मारहाणीनंतर गेल्या ६ दिवसांपासून या डॉक्टरांचा संप चालू आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्याचे १५ जून या दिवशी सांगितले होते आणि अन्य काही मागण्या असल्यास चर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्यावर १६ जून या दिवशी डॉक्टरांनी चर्चेची सिद्धता दर्शवली; मात्र त्यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत. तसेच अद्याप त्यांनी संप मागेही घेतलेला नाही.

डॉक्टरांनी मंत्रालयात जाऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करण्याऐवजी जाहीररित्या आणि प्रसारमाध्यमे यांंच्या उपस्थितीत चर्चा करण्याची अट घातली आहे. तसेच ‘बैठक कधी आणि कुठे घ्यायची, हे ममता बॅनर्जी यांनीच ठरवावे’, असेही म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF