पुणे येथे घरफोड्या करणार्‍या सराईत टोळीला अटक

वाढत्या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत !

पुणे – पुणे शहरासह पुणे जिल्हा आणि सोलापूर येथे घरफोड्यांसह १५० पेक्षा अधिक गुन्हे करणार्‍या सराईत टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कह्यातून ४ चारचाकी, ५ दुचाकी, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, कोयता, मिरची पूड, कटावणी असा मिळून २६ लाख ४४ सहस्र रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिसांनी एकूण ४ जणांना अटक केली असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. (वाढत्या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असणे हे समाजाच्या खालावलेल्या नैतिकतेचे लक्षण होय. यासाठी शाळांमधून लहान वयातच धर्मशिक्षण देणे बंधनकारक करणे अपरिहार्य आहे. – संपादक) त्याच्या नावावर ३५ गुन्हे नोंद असून सर्वांवर आतापर्यंत एकूण १५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. (प्रत्येक गुन्हा झाल्यावरच अशांवर कठोर कारवाई केली असती, तर घरफोडीच्या इतक्या घटना घडल्याच नसत्या ! – संपादक)

येरवड्यातील घरफोडीच्या घटनेचा तपास करतांना आरोपी चारचाकीतून येरवड्यातील एटीएम् यंत्रावर दरोडा टाकणार असल्याची माहिती समजल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.


Multi Language |Offline reading | PDF