सायबर पोलीस ठाणे हे मुंबई पोलिसांचे देशातील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पहिल्या सायबर पोलीस ठाण्याचे वांद्रे येथे भूमीपूजन

मुंबई, १६ जून – आता गुन्हे रस्त्यावर न घडता ‘व्हाईट कॉलर’ गुन्हे अधिक घडत आहेत. एकीकडे डिजीटलायझेशन वेगाने होते आहे, त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यादृष्टीने भारत आणि महाराष्ट्र सरकार हे गुन्हे रोखण्यासाठी आणि घडलेला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काम करत आहे. याचा एक भाग म्हणून वांद्रे येथे उभे रहाणारे सायबर पोलीस ठाणे हे मुंबई पोलिसांचे देशातील एक पहिले आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. वांद्रे पश्‍चिम येथे उभारण्यात येणार्‍या अद्ययावत सायबर पोलीस ठाण्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

भूमीपूजनानंतर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलीस दलातील एक सहस्र अधिकार्‍यांना विशेष प्रशिक्षण देऊन महाराष्ट्राची एक स्वतंत्र ‘सायबर आर्मी’ उभी केली जाणार आहे.

एकूण दहा मजली ही इमारत उभी रहाणार असून त्याच्या पहिल्या सहा मजल्यावर सायबर पोलीस ठाणे, प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, तर उर्वरित चार मजल्यावर अधिकार्‍यांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF