संतसाहित्य श्राव्य (ऑडिओ) स्वरूपात उपलब्ध होणार !

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम

पुणे – महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा आणि नामदेव गाथा हे ग्रंथ श्राव्य (ऑडिओ) स्वरूपात उपलब्ध केले जाणार आहेत. यंदाच्या वारीपूर्वी ज्ञानेश्‍वरी आणि तुकाराम गाथेतील काही भाग श्रोत्यांसमोर आणण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यांच्या ध्वनीतबकड्या वारीमार्गावर वितरित करण्याचा आदेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. सध्या ग्रंथांचे निवेदन, गायन आणि संगीत यांवर काम चालू असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्या संकेतस्थळावरूनही तो विनामूल्य ‘डाऊनलोड’ करता येणार आहे. वारीच्या निमित्ताने सध्या सरकारकडे किंवा बाजारात उपलब्ध नसलेल्या ‘संत श्री नामदेव गाथा’ या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करण्यात येणार असून तो ५० टक्के सवलतीच्या दरात म्हणजे ४७२ रुपयांना उपलब्ध होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF