सोलापूर येथील अधिवक्त्यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी पोलिसांच्या कह्यात 

सोलापूर – येथे ८ जून या दिवशी झालेल्या अधिवक्ता राजेश कांबळे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बंटी खरटमल आणि अधिवक्ता सुरेश चव्हाण यांना कह्यात घेतले. सुरेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून बंटी खरटमल याने अधिवक्ता कांबळे यांची हत्या केली आहे. बंटी खरटमल याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ८ जून या दिवशी बंटीने सुरेश कांबळे यांना घरी बोलावून चहातून गुंगीचे औषध देऊन ठार केले. त्यानंतर १० जूनला बंटीने राजेश कांबळे यांच्या मृतदेहाचे तुकडे करून दोन पोत्यांत भरले. ‘ही पोती नेण्यासाठी चारचाकी घेऊन येतो’, असे सांगून गेलेला अधिवक्ता सुरेश चव्हाण पसार झाला. सुरेश चव्हाण याला सिंदगी येथून पोलिसांनी पकडले. या प्रकरणात येथील एका नगरसेवकाचाही सहभाग असल्याचा संशय आहे.


Multi Language |Offline reading | PDF