‘‘लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मित्रपक्षांनी धोका दिला !’’

भ्रष्ट कारभार करून जनतेला धोका देणार्‍या काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात !

महाराष्ट्र राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई – काँग्रेसचे संघटन कुठे कमकुवत आहे आणि कुठे भक्कम आहे, ती ठिकाणे आम्ही निश्‍चित केली आहेत, तसेच मित्रपक्षांना कोणत्या जागांवर उमेदवारी द्यायची, याचासुद्धा कच्चा आराखडा सिद्ध केला आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मित्रपक्षांनी धोका दिला, हे आता स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. (सत्तेसाठी एकत्र आलेले स्वार्थी पक्ष कधीतरी एकमेकांशी एकनिष्ठ राहू शकतील का ? – संपादक) १४ जून या दिवशी टिळक भवनात खर्गे यांनी मुंबई आणि कोकण येथील लोकसभा निवडणुकांतील काँग्रेसला मिळालेल्या यशापयशाचा आढावा घेतला. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. या वेळी खर्गे म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांसमवेत असलेली महाआघाडी अभंग राहील. येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व मुळीच चर्चा करणार नाही. या आघाडीला महाआघाडीत घ्यायचे कि नाही, त्यांना किती जागा द्यायच्या, याचा निर्णय राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीच घ्यायचा आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF