भारत-म्यानमार सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यांकडून आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त कारवाई

आतंकवाद्यांचा पूर्ण निःपात होईपर्यंत भारतीय सैनिकांना कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारने द्यावी, अशी भारतियांची अपेक्षा आहे !

नवी देहली – भारत आणि म्यानमार यांच्या सैन्याने केलेल्या संयुक्त कारवाईत सीमेवर असणार्‍या आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच पळून जाणार्‍या ७० ते ८० आतंकवाद्यांना पकडण्यात आले. आतंकवाद्यांच्या उल्फा, केएल्ओ, एन्ईएफ्टी या संघटनांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईचे नाव ‘ऑपरेशन सनशाईन २’ असे  ठेवण्यात आले होते. १६ मेपासून ८ जूनपर्यंत दोन्ही देशांच्या सैन्याने ही कारवाई केली. ‘ऑपरेशन सनशाईन १’ हे २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले होते. भारत आणि म्यानमार या २ देशांना जोडणार्‍या रस्त्याचे काम चालू आहे. रस्त्याच्या विकासकामाला विरोध करण्यासाठी आतंकवाद्यांकडून तेथे आक्रमण करण्याचीही शक्यता आहे.

वर्ष २०१५ मध्येही भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर अशा प्रकारे कारवाई केली होती. त्या वेळी म्यानमार सेनेने भारतीय सैन्याच्या कारवाईवर अप्रसन्नता व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा म्यानमार सेनेला विश्‍वासात घेऊन भारतीय सैन्याने ही संयुक्त कारवाई केली.


Multi Language |Offline reading | PDF