पाटण (जिल्हा सातारा) येथे गावठी कट्ट्यासह युवक कह्यात

महाराष्ट्रातील गुन्हेगारीत वाढ !

पाटण (जिल्हा सातारा), १६ जून (वार्ता.) – येथील जुन्या बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍या दोन युवकांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कह्यात घेतले. त्यांच्याकडून २ गावठी कट्टे, एक गोळी, दुचाकी वाहन, दोन भ्रमणभाष असा १ लाख ६७ सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आकाश उत्तम कोळी आणि सागर गौतम वीर अशी त्यांची नावे आहेत.


Multi Language |Offline reading | PDF