अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत संपूर्ण कुटुंबावर साधनेचे संस्कार करणार्‍या डोंबिवली येथील श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी

डोंबिवली (जिल्हा ठाणे), १६ जून (वार्ता.) – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खचून न जाता संघर्ष करत आणि सर्व लोटलीकर कुटुंबियांवर साधनेचे संस्कार करत त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणार्‍या श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे १६ जूनला झालेल्या अनौपचारिक भेटीच्या कार्यक्रमात सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी यांनी ‘श्रीमती लोटलीकरआजी या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदाला पोचल्या आहेत’, अशी घोषणा केली अन् सर्व उपस्थित साधक आणि पू. आजींचे कुटुंबीय भावविभोर झाले. पू. गडकरीकाका यांनी पू. (श्रीमती) लोटलीकरआजी यांना पुष्पहार अर्पण करून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

लहानपणापासून आजारपण, गरिबी, लग्नानंतरही अनेक समस्यांना तोंड देत पू. आजींनी कष्ट करत आणि श्रद्धेची कास धरत मुले, नातवंडे आणि पतवंडे यांच्यामध्ये संस्कारांचे बीज रोवून त्यांना आदर्श असे घडवले आणि सर्व कर्तव्ये भगवंतावर श्रद्धा ठेवून पार पाडली.

संतसोहळ्याचे सविस्तर वृत्त वाचा लवकरच…


Multi Language |Offline reading | PDF