वटवृक्षाखाली तपश्‍चर्या करण्याचे महत्त्व

प.पू. आबा उपाध्ये  कै.प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

१. वटवृक्षाखाली तपश्‍चर्या सफल होतांना अन्न, पाणी, वायू आणि अग्नी यांच्या देवतांचे साध्यमंत्रही मिळणे

‘या वटवृक्षामध्ये अन्न, पाण्याप्रमाणे अग्नीही आहे. अग्निदेवता या वृक्षातून प्रज्वलित करता येते. पर्जन्यास्त्र, अग्नीअस्त्र, तसेच वायूअस्त्रही यात वास करून असतात. अस्त्रांच्या देवता आत आहेत. या वृक्षाखाली तपस्वी तपश्‍चर्या करत असतांना त्यांच्या शरिरामध्ये आपोआप अन्नाचे प्रक्षेपण होत असे. तपश्‍चर्या सफल होतांना ध्यानस्थ अवस्थेत त्यांना वटवृक्षात असलेले अन्न, पाणी, वायू आणि अग्नी या देवतांचे साध्य मंत्र मिळत असत.

२. वृक्षाची छाया सोडून इतरत्र देव प्रसन्न होण्यासाठी मंत्रजप करायचा असल्यास १ लाखाऐवजी ते साडेतीन अब्ज एवढे करावे लागणे

या वृक्षाखाली बसून ते मंत्र साधकांनी केवळ १ लाख वेळा जपायचे असतात. हेच मंत्र वृक्षाची छाया सोडून इतरत्र म्हणायचे झाल्यास साडेतीन अब्ज इतके करावे लागतात. या वटवृक्षाखाली बसून हे जप करतांना आपोआप अन्न-पाण्याचीही सोय होते. (क्रमश:)

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून, १२.१०.१९८१)


Multi Language |Offline reading | PDF