सनातनचे आपत्कालीन आरोग्याविषयीचे ग्रंथ म्हणजे कलियुगातील संजीवनी विद्या !

(सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

१. सनातनच्या आपत्कालीन ग्रंथांचे (प्राणशक्तीवहन उपाय पद्धती, बिंदूदाबनआणि रिफ्लेक्सॉलॉजी इत्यादींचे) महत्त्व

‘आगामी काळात जर तिसरे महायुद्ध झाले, तर त्या वेळी विदेशी उपचार पद्धती, औषधे, तसेच आधुनिक वैद्य उपलब्ध होणार नाहीत. त्याचप्रमाणे अणूबॉम्बने आक्रमण झाल्यास बहुतांश वनस्पती नष्ट झाल्याने आयुर्वेदिय उपचारांनाही मोठ्या प्रमाणात मर्यादा येतील. त्या काळात सनातनचे आपत्कालीन आरोग्याविषयीचे ग्रंथ कलियुगातील संजीवनी विद्या ठरणार आहेत.

२. ‘संजीवनी विद्या’ म्हणजे त्या त्या काळातील अवतारी पुरुषांच्या संकल्पाने मानव सृष्टीतील सत्त्वगुणी जिवांना संभाव्य विनाशापासून वाचवणारी विद्या !

कालमहात्म्यानुसार युग परिवर्तनकाळात मानव सृष्टीला संभाव्य विनाशापासून तारणारी विद्या ही त्या त्या काळातील संजीवनी विद्याच होय. हे गुह्य समजून ‘वर्तमान काळातील सनातनच्या आपत्कालीन ग्रंथाचा लाभ करून घेणारे ‘येणार्‍या आपत्काळात कलियुगातील संजीवनी विद्येमुळे वाचले होते’, अशी नोंद पुढील आध्यात्मिक इतिहासात होईल’, यात शंका वाटत नाही. संजीवनी विद्या ही त्या त्या काळातील अवतारी पुरुषांच्या संकल्पाने मानव सृष्टीतील सत्त्वगुणी जिवांना होणार्‍या विनाशातून वाचवणारी विद्या असते.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१.७.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF