अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास १० वर्षांचा सश्रम कारावास

सातारा, १६ जून (वार्ता.) – येथील कडवळ्याच्या शेतात ४ जुलै २०१५ या दिवशी आरोपी धनाजी शिंदे याने अल्पवयीन गतीमंद मुलीवर बळजोरीने अत्याचार केले.  याप्रकरणी दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास आणि २० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF