केरळमध्ये अजाझ नामक वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने महिला पोलीस अधिकार्‍याला जिवंत जाळले !

‘अल्पसंख्यांकांना सैन्यात आणि पोलीसदलात भरती करा’, अशी मागणी करणारे आता गप्प का ?

मावेलिक्कारा (केरळ) – येथे ३४ वर्षीय पोलीस अधिकारी सौम्या पुष्पाकरन् यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अजाझ नावाच्या वाहतूक पोलीस कर्मचार्‍याला अटक केली आहे. सौम्या यांना ३ मुले असून त्यांचे पती विदेशात कामाला आहेत.

सौम्या दुचाकी वाहनावरून घरी जात असतांना एका चारचाकी गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. या वाहनातील आरोपी अजाझ कुर्‍हाड घेऊन बाहेर आला. त्याला पाहून सौम्या पुष्पाकरन् पळाल्या. तेव्हा अजाझने त्यांचा पाठलाग करून वार केला आणि नंतर सौम्या यांच्यावर पेट्रोल ओतून जाळले. यात अजाझ हाही घायाळ झाला. ‘त्याच्या चौकशीनंतरच या हत्येमागील कारण समजू शकेल’, असे पोलिसांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF