हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आयोजित अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांतर्गत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन’ याच्या दुसर्‍या दिवसाचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र स्थापना’ यांसाठी गोवा येथील रामनाथ देवस्थानातील सभागृहामध्ये चार दिवसांचे ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन’ याचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसाचे, म्हणजे ६.६.२०१९ या दिवसाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

श्री. निषाद देशमुख

१. सौ. क्षिप्रा जुवेकर आणि श्री. कार्तिक साळुंके

 हिंदु जनजागृती समिती कार्य परिचय

१ अ. सौ. क्षिप्रा जुवेकर

सौ. क्षिप्रा जुवेकर

१. सौ. क्षिप्राताई विषय तळमळीने आणि भावयुक्त मांडत असल्याने वायूमंडलात दाबाच्या प्रमाणात वाढ न होता अधिक प्रमाणात उत्साह जाणवत होता.

२. सौ. क्षिप्राताई धर्मप्रेमींच्या मनातील प्रश्‍न ओळखून मार्गदर्शन करत असल्याने त्यांच्या बोलण्यातील चैतन्याच्या प्रमाणात वाढ होत होती.

३. सौ. क्षिप्राताई यांच्या बोलण्यात भाव आणि अन्यायाप्रतीची चीड दोन्ही दिसत होते. यामुळे त्यांचे मार्गदर्शन होतांना मन एकाग्र होत होते.

४. सौ. क्षिप्राताई क्षात्रतेजाने विषय मांडत असल्याने वाईट शक्ती त्यांच्यावर आक्रमणे करून त्यांना त्रास देत होत्या. यामुळे त्यांचा चेहरा थकलेला आणि प्राणशक्ती खेचल्याप्रमाणे दिसत होता.

१ आ. श्री. कार्तिक साळुंके

श्री. कार्तिक साळुंखे

१. श्री. कार्तिकदादा त्यांचा विषय तळमळीने मांडत असल्याने त्यांना ईश्‍वराची शक्ती ग्रहण करून माहिती सांगणे शक्य होत होते.

२. श्री. कार्तिकदादा विषय मांडतांना त्यांचे मन काही प्रमाणात विचारहीन असल्याने त्यांना ईश्‍वराचे विचार ग्रहण करता येत होते. यामुळे मरगळ अल्प करायला धर्मप्रेमींकडून जयघोष करवून घेणे इत्यादी कृती त्यांच्याकडून आपोआप होत होत्या.

३. श्री. कार्तिकदादा यांच्यात ‘तत्त्वनिष्ठता’ हा गुण आहे. हा गुण असलेला जीव समष्टीला अध्यात्माकडे नेण्यास साहाय्य करतो. यामुळे कार्तिकदादा यांच्या मार्गदर्शनामुळे समष्टीला ईश्‍वराला अपेक्षित असे घडण्यात साहाय्य होत होते.

२.  साधनेसाठी गुणसंवर्धन सत्र

२ अ. श्रीमती अश्‍विनी कुलकर्णी आणि श्री. चेतन गाडी

वेळेचे सुनियोजन कसे करावे ?

२ अ १. अश्‍विनी कुलकर्णी

श्रीमती. अश्विनी कुलकर्णी

अ. अश्‍विनी कुलकर्णी बोलतांना त्यांच्यातील तळमळीमुळे विषय ऐकतांना चांगले वाटत होते.

आ. अश्‍विनी कुलकर्णी सोप्या भाषेत आणि उदाहरणासहित विषय मांडत असल्यामुळे श्रोत्यांना विषयाचे सहजतेने आकलन होत होते.

इ. अश्‍विनी कुलकर्णी यांच्या विषयाचा परिणाम होऊ नये; म्हणून पाताळातील मोठ्या वाईट शक्ती आक्रमणे करून त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण करत होत्या.

२ अ २. श्री. चेतन गाडी

श्री. चेतन गाडी

अ. श्री. चेतन गाडी बोलतांना वायूमंडलातील शक्तीच्या प्रमाणात वाढ होत होती.

आ. श्री. गाडी यांनी विषय चालू केल्यावर वायूमंडलातील तिर्यक, म्हणजे रजोगुणी लहरींमध्ये वाढ होत होती.

२ अ ३. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

(सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

अ. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांनी विषय मांडणे चालू केल्यावर वायूमंडलातील हलकेपणात वाढ होणे चालू झाले.

आ. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका धर्मप्रेमींना चुकांची जाणीव करवून देत असतांना त्यांच्यातील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज प्रगट होऊन उपस्थित श्रोत्यांच्या मनावर परिणाम करत होते.

इ. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका मार्गदर्शन करत असतांना त्यांच्यातील प्रीती आणि नेतृत्व हे दोन्ही गुण एकत्रित कार्यरत असल्याने धर्मप्रेमींच्या चित्तावर योग्य संस्कार निर्माण होऊन त्यांना पुढची दिशा मिळत होती.

२ आ. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्मकार्य समर्पित भावाने करण्याचे महत्त्व

१. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका बोलतांना उच्च लोकांशी एकरूप होत गेल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा परिणामातही वाढ होत होती.

२. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका मार्गदर्शन करत असतांना सर्व धर्मप्रेमींच्या कुंडलिनीचक्रांमध्ये प्राणशक्ती मूलाधार चक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत प्रवाहित होत होती. ‘त्याग करण्याची मन आणि बुद्धी यांची सिद्धता नसल्यास त्यांच्याकडून प्राणशक्ती अधिक शोषली जाते. यामुळे विविध अडचणी निर्माण होतात. या अडचणी चैतन्यामुळे अल्प होत असल्याने अधिक प्रमाणात प्राणशक्ती सर्व कुंडलिनीचक्रांमध्ये प्रवाहित होत होती.

३. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका बोलतांना पूर्ण सभागृहात सर्वजण स्थिर झाले होते आणि एकाग्रतेने सर्व विषय एकत होते. सद्गुरु पिंगळेकाका यांच्यातील चैतन्यामुळे सभागृहात आणि धर्मप्रेमींमध्ये कार्यरत रजोगुण अल्प होऊन सत्त्वगुणात वाढ होण्याचे हे परिणाम आहेत’, असे लक्षात आले.

४. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका विषय मांडतांना त्यांच्या वाणीत पालट होत होते. विषय चालू करतांना ते मध्यमा वाणीत बोलत होते, तर पुढे पुढे त्यांचे मार्गदर्शन पश्यंती वाणीत होत होते. या उच्च वाणीमुळे माझे त्यांच्या शब्दांकडील लक्ष न्यून होऊन ध्यानासारखी अवस्था निर्माण होत होती.

५. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका विषय मांडतांना त्यांच्याकडून वलयाच्या स्वरूपात सगुण आणि निर्गुण शक्ती प्रक्षेपित होत होती. ते बोलतांना सगुण शक्ती, तर शक्तीचे अंतर वाढत गेल्यावर सगुण शक्तीचे निर्गुण शक्तीत रूपांतर होत होते. तेव्हा ‘सगुण शक्तीचे वलय मोठे, तर निर्गुण शक्तीचे वलय लहान होत आहे’, असे लक्षात आले.

६. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका त्यागाचा विषय मांडत असतांना तपोलोकातील वायूमंडल आणि स्पंदने अनुभवायला येत होते. समष्टी साधनेसाठी सर्वस्वाचा त्याग केल्यावर तपोलोकात स्थान मिळते. त्यानुसार उच्च स्तरीय त्यागाच्या संदर्भात सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका सांगत असल्याने ईश्‍वर तसे वायूमंडल आणि स्पंदने सिद्ध करून सर्वांना सूक्ष्म स्तरावर त्याची अनुभूती देत होता.

७. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका विषय मांडत असतांना त्यांच्याभोवती श्‍वेत प्रकाश दिसत होता. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका स्वतः त्यागमूर्ती असून त्यागाच्या संदर्भातील विषय मांडत असल्याने त्यात तात्त्विक आणि प्रायोगिक हे दोन्ही स्तर होते. ते ईश्‍वराशी एकरूप होऊन विषय मांडत असण्याची ही प्रक्रिया आहे. यामुळे विषयाचा अधिक परिणाम ऐकणार्‍यांवर होत होता.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.६.२०१९, सकाळी ११.३०)


Multi Language |Offline reading | PDF