मी परम पूज्यांचं तान्हुलं ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘हे श्रीकृष्णा, मी परम पूज्यांचं तान्हुलं ॥ धृ. ॥

रामनाथीकडे चालले छोटे पाऊल ।
खेळण्यासाठी दे ना रे मोरपिसाचे खुळखुळ ॥

खाऊसाठी दे ना नामाचं गुलगुल ।
रांगत रांगत जाऊन परम पूज्यांच्या चरणांवर वाहीन ।
माझे मनरूपी गुलाबाचे फूल ॥ १ ॥

माझी परममाऊली बरी । श्रद्धाभक्तीचा पाळणा करी ॥
धरूनी नामजपाची दोरी । साधकांचा सांभाळ करी ॥
साधना सांगून गुरुआई । प्रेमाने गाते अंगाई ॥ २ ॥

होईल धर्माचरणाने भलं । गुर्वाज्ञापालनाचे मिळेल फल ॥
लागे हिंदु राष्ट्राची चाहुल । साधना करून होऊ भगवंताचे लाडके सोनुलं ॥ ३ ॥

‘हे भगवंता, आज मला तू भावजागृतीत तुझे तान्हुलं करून घेतलेस. यासाठी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’

– श्रीमती पद्मा मोकाशे (गावाचे नाव ठाऊक नाही.) (१०.१२.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF