वारंवार वैद्यांकडे जावे लागणे याला विकास किंवा प्रगती म्हणू शकतो का ?

श्री. आनंद जाखोटिया

‘काही वर्षांपूर्वी १ गावात केवळ १ वैद्य रहात होता; परंतु आता वर्तमानकाळात एका गावात १० पेक्षाही अधिक वैद्य असतात. गावोगावी मानसोपचार तज्ञ, अस्थिरोगतज्ञ वाढत आहेत. हे प्रगतीचे लक्षण आहे का ? काही लोक म्हणतात, ‘आम्ही २५ वर्षांपासून एकाच वैद्याकडे जातो.’ ही अभिमानाची गोष्ट कशी असू शकते ? ‘दुसरे रोगी वैद्यांकडे जातात; पण आम्हाला पुनःपुन्हा जावे लागत नाही’, असे व्हायला पाहिजे. ही सुधारणा नसून संहार चालू आहे. पूर्वीच्या काळी एक माणूस १०० किलोचे पोते उचलू शकत होता; परंतु आता वर्तमानकाळात ही क्षमता २५ किलो झाली आहे. ही मर्यादा मानवाधिकारानेच निर्धारित केलेली आहे. आणखी १० वर्षांनंतर ही स्थिती १० किलोपर्यंत सीमित होईल.’

– श्री. आनंद जाखोटिया, उज्जैन, मध्यप्रदेश.


Multi Language |Offline reading | PDF