सनातनचे प्रगतीचे मोजमापन ‘आध्यात्मिक उन्नती’ आहे, हे लक्षात घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एखादा उद्योगपती स्वत:च्या प्रगतीचे मोजमापन आर्थिक लाभ किती झाला यावर करतो. राजकीय पक्ष ‘स्वत:चे किती कार्यकर्ते खासदार किंवा आमदार झाले, किती राज्यांमध्ये सत्ताप्राप्ती झाली’, यांवर त्यांच्या प्रगतीचे मोजमापन करतात. सत्तेतील राजकीय पक्ष भौतिक विकास किती केला, याचे मोजमापन करतात, म्हणजेच भौतिक जगतात प्रगतीचे मोजमापन स्थूल गोष्टींवर आधारित असते; मात्र सनातन संस्था अध्यात्मप्रसार करणारी संस्था आहे. त्यामुळे ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ या तत्त्वावर सनातनची श्रद्धा आहे; म्हणून सनातनचे प्रगतीचे मोजमापन स्थुलावर नाही, तर सूक्ष्मातील प्रगतीवर आधारित आहे, उदा. ‘लोकसभेत आपले किती खासदार झाले ?’, यापेक्षा ‘किती साधक संत झाले ?’, याकडे सनातनचे लक्ष असते. ‘समाज आर्थिकदृष्ट्या किती संपन्न झाला’, यापेक्षा ‘समाजातील किती लोक साधनेकडे वळले’, हे सनातनला महत्त्वाचे वाटते. म्हणजेच काही राज्यांत सत्ताप्राप्ती करण्याच्या खुज्या विचारांत न अडकता ‘विश्‍वव्यापी ईश्‍वराशी एकरूप होणे’, हेच सनातनचे अंतिम ध्येय आहे. यावर सनातनची अढळ निष्ठा आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF