पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर उभारू ! – खासदार संजय राऊत

अयोध्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर उभारू, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे केले. १६ जून या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह अयोध्येच्या दौर्‍यावर जात आहेत. ते येथे रामललाचे दर्शन घेणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF