बंगालला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटल्याने जनता दल (सं)च्या प्रवक्त्याला द्यावे लागले त्यागपत्र

जनता दल (संयुक्त) या पक्षाची धर्मनिरपेक्षता किती बेगडी आहे, याचे हे उदाहरण होय. धर्मांधांच्या धर्मांधतेविषयी परखडपणे मते मांडल्यास त्या पक्षातील पदाधिकार्‍याला पद गमवावे लागते, यावरून हा पक्ष अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी किती लाचार आहे, हे दिसून येते !

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील सत्ताधारी जनता दल(संयुक्त)चे प्रवक्ते अजय आलोक यांनी बंगाल राज्याला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटल्याने त्यांना त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे लागले आहे. ते म्हणाले, ‘मी पक्षाच्या विचारांना योग्य प्रकारे मांडू शकत नव्हतो. बंगालमध्ये बिहारी लोकांना मारण्यात येत होते, जे अयोग्य होते. माझ्या विचारानुसार बंगाल ‘मिनी पाकिस्तान’ बनत आहे; मात्र माझा पक्ष वेगळा विचार करत आहे. त्यामुळे मला त्यागपत्र देणेच योग्य होते.’ (याचाच अर्थ अजय आलोक यांचा पक्ष डॉक्टरांना मारहाण करणार्‍या धर्मांधांचा अधिक विचार करतो, हे स्पष्ट होते ! पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पाकिस्तानचा दौरा केला होता. यातून बिहारमधील मुसलमानांची मते मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून धर्मांधांची बाजू घेतली गेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक)

अजय आलोक यांनी म्हटले होते की, बंगालमध्ये दीड कोटी बिहारी आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहे. त्यांच्यासाठी आम्ही आवाज उठवणार नाही, तर कोण उठवणार? (बिहारमधील जनतेने हे लक्षात घ्यावे की, जनता दल (संयुक्त) हा बिहारींसाठी नव्हे, तर बिहारमधील मुसलमानांसाठी कार्यरत आहे ! हा पक्ष बिहारींचे हित काय साधणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF