(म्हणे) ‘याला सरकार नव्हे, तर नशीब उत्तरदायी !’ – बिहारचे आरोग्यमंत्री

बिहारमध्ये मेंदूज्वरने ६७ बालकांचा मृत्यू

अशा प्रकारचे स्वतःचे दायित्व झटकणारे जनता दल(संयुक्त)चे मंत्री लोकशाही निरर्थक ठरवतात !

पाटलीपुत्र (बिहार)  – बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत ६७ मुलांचा मृत्यू झाला आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वांच्या मृत्यूचे कारण ‘हायपोग्लीसेमिया’ (मेंदूतील ताप) आहे. राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांनी म्हटले की, यासाठी सरकार किंवा प्रशासन उत्तरदायी नाही, तर त्या मुलांचे नशीब तसे होते. त्यांनी हवामानाला देखील दोष दिला.


Multi Language |Offline reading | PDF