‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून एप्रिल २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ‘ऑनलाईन’ संगणकीय प्रणालीतून ही वाचकसंख्या मिळते. सध्याच्या काळात माहितीजालाचा वापर करणारे अनेक जण ‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आदी सामाजिक संकेतस्थळांच्या (‘सोशल नेटवर्किंग’च्या) माध्यमातून क्रियाशील असतात. सनातन संस्थेनेही काळाची आवश्यकता ओळखून काही वर्षांपूर्वी ‘फेसबूक’, तसेच ‘ट्विटर’ या संकेतस्थळांवर आपले खाते उघडून अध्यात्मप्रसाराला आरंभ केला. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

२. विविध भाषांतील संकेतस्थळांना भेट देणार्‍या वाचकांची संख्या

३. संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारा ‘ऑनलाइन’ प्रसार

३ अ. ‘फेसबूक’वरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ‘पोस्ट्स’

३ आ. ‘सनातन पंचांगाच्या अ‍ॅप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या ‘नोटिफिकेशन’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! : सनातन पंचांगाच्या ‘Android’ आणि ‘iOS’ अ‍ॅपद्वारे पाठवण्यात येणार्‍या मराठी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या भाषांतील ‘नोटिफिकेशन’मुळेे ८२,६४२ वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली.

४. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख

५. संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्माविषयी योग्य माहिती मिळत असल्याने वाचकांनी विविध शंकांचे निरसन करून घेणे

संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध आध्यात्मिक विषयांचे ज्ञान मिळत असल्याने साधनेच्या संदर्भात प्रश्‍न विचारणार्‍या जिज्ञासूंची संख्या वाढत आहे. या मासात जिज्ञासूंनी ‘दृष्ट का आणि कशी लागते ?’, ‘बिंदूदाबनाच्या संदर्भातील प्रायोगिक अडचणी’, ‘देवघरात देवतांची मांडणी कशी करावी ?’ आदी विषयांच्या संदर्भातील प्रश्‍न विचारून शंकानिरसन करून घेतले.

प्रार्थना

‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळेच Sanatan.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्मप्रसार होत आहे. या संकेतस्थळाशी निगडित सेवा करण्याची संधी आम्हाला दिलीस’, यासाठी आम्ही सर्व साधक तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत.

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ट्विटर’, ‘गूगल प्लस’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.


Multi Language |Offline reading | PDF