इंटरनेटच्या अतीवापराने तरुणांना ‘नेटब्रेन’ या नवीन रोगाने ग्रासणे !

‘सध्याच्या काळात सर्वत्र इंटरनेटचा वापर इतका वाढलेला आहे की, लोकांचे परस्परांना भेटण्याचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅॅप्लीकेशन, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या माध्यमांचा वापर करून ते एकमेकांच्या संपर्कात रहातात; परंतु सर्वांचे प्रिय इंटरनेट सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेला आहे. इंटरनेटचा अतीवापर केल्यामुळे समाजात मानसिक विकारांचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील अनुमाने २० कोटी लोकांना इंटरनेटच्या अनावश्यक वापराची वाईट सवय लागलेली आहे. यांत सर्वांत अधिक प्रमाण तरुणांचे असल्यामुळे ते ‘नेटब्रेन’ नावाच्या नवीन व्याधीने ग्रासित होत आहेत. या व्याधीमुळे व्यक्ती समाजापासून दूर जाणे आणि मानसिक स्तरावर अस्थिर होणे अशा मानसिक अन् सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.’

(संदर्भ : मासिक ‘समाज प्र्रवाह’, १५ जुलै २०१५)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now