नेपाळमधील मुसलमान संघटनेचा सनातन हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी मोर्चा

नेपाळच्या सत्ताधारी साम्यवादी पक्षाच्या सरकारकडून आणलेल्या धार्मिक स्थळांचे नियंत्रण करणार्‍या विधेयकाचा विरोध

  • भारतात कधीतरी असे होऊ शकते का ?
  • नेपाळमध्ये धार्मिक स्थळे नियंत्रण घेण्यास मुसलमान विरोध करतात, तर भारतात हिंदूंच्या अनेक मंदिरांचे सरकारीकरण होऊनही हिंदू निष्क्रीय रहातात !
  • साम्यवादी भारतात काय किंवा नेपाळमध्ये सत्तेत आल्यावर हिंदुद्वेषी कारवाया करतात, हे लक्षात घ्या !

काठमांडू (नेपाळ) – काठमांडूच्या खोर्‍यात रहाणार्‍या मुसलमानांनी सनातन हिंदु संस्कृतीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. केपी शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने ‘गुथी (न्यास) अधिनियम’मध्ये संशोधन करणे आणि सार्वजनिक अन् खासगी न्यासांचे राष्ट्रीयीकरण करणे, तसेच एक शक्तीशाली आयोगाच्या अंतर्गत सर्व धार्मिक स्थळांचे नियंत्रण करणारे विधेयक सादर केले आहे. त्याचा या मुसलमानांनी विरोध केला आहे.

स्थानिक मुसलमानांच्या ‘नेवार मुस्लिम सोसायटी’च्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाची मागणी करण्यासाठी नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोर्चा काढला. या वेळी या मागणीचे फलक त्यांनी हातात धरले होते. या संघटनेने म्हटले की, कम्युनिस्ट पक्षाने संसदेत सादर केलेल्या विधेयकाला समर्थन मिळाले, तर हिंदु धर्म संकटात सापडू शकतो.


Multi Language |Offline reading | PDF