श्रीमती स्मिता नवलकर यांच्याकडे असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले पालट

श्रीमती स्मिता नवलकर

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र गेली १५ वर्षे आमच्याकडे आहे. त्या छायाचित्रातील प्रभावळ छायाचित्रकाराने (फोटोग्राफरने) संगणकावर बनवली होती; परंतु आमच्या खोलीत ठेवल्यावर तिच्यामध्ये अल्पाधिक प्रमाणात वाढ होत होती. छायाचित्रातील गुरुदेवांचा सदरा पांढर्‍या रंगाचा होता. छायाचित्रातील भूमीच्या लाद्याही पांढर्‍या रंगाच्या होत्या; परंतु गेल्या ८ – ९ वर्षांपासून या रंगांमध्ये पालट व्हायला लागले. हळूहळू त्या छायाचित्राला पिवळसर छटा आली. नंतर गुरुदेवांचा सदरा आणि लादी पिवळ्या रंगात पालटू लागले आणि आता त्यांचा रंग पूर्णपणे पिवळा झाला आहे. गुरुदेवांच्या मुखावर शांती अधिक प्रमाणात जाणवत आहे. ‘ते छायाचित्र निर्गुणतत्त्वाकडे जात आहे’, असे मला जाणवते. छायाचित्रातील निळा रंगही कधी फिकट, तर कधी गडद होत असतो. गुरुदेवांच्या चरणांजवळील काही लाद्यांचा रंग पांढरा होत चालला आहे. छायाचित्राला सुगंध येत आहे. गुरुदेवांनी ही अनुभूती दिल्याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF