हातात ‘फ्रेंडशिप बॅण्ड’ बांधल्याने होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे चित्र

‘फ्रेंडशिप बॅण्ड’सारख्या गोष्टींचे दुष्परिणाम जाणा !

‘फ्रेंडशिप बॅण्ड’ (मैत्रीचे बंधन) बांधणे ही पाश्‍चात्त्य संकल्पना असून अशा प्रकारचे ‘बॅण्ड’ बांधल्यावर मनगटात त्रासदायक शक्तींचा प्रवाह आकृष्ट होतो, तसेच भावनेचे चक्राकार वलय कार्यरत होते. हे मायावी शक्तींचे वलय त्रासदायक शक्ती त्या व्यक्तीमध्ये आणि वातावरणात प्रक्षेपित करते !

भारतीय परंपरेनुसार हातात तांब्याचे कडे घाला !

भारतीय संस्कृतीत पुरुषांनी हातात कडे घालायची पद्धत आहे. हातात योग्य पद्धतीचे तांब्याचे सात्त्विक कडे घातल्याने सूर्यदेवतेकडून येणारे तत्त्व कार्यरत होऊन त्याच्या चैतन्याचा लाभ कडे घालणार्‍या जिवाला होतो.

विशुद्धचक्रावर टॅटू काढल्यावर व्यक्तीवर होणार्‍या सूक्ष्मातील परिणामाचे चित्र

टॅटू त्वचा देत असलेले नैसर्गिक आध्यात्मिक संरक्षण अल्प करतात. ते आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य स्पंदने निर्माण करतात; ही स्पंदने नकारात्मक शक्तींना आकृष्ट करतात. टॅटूच्या ठिकाणची त्वचा नकारात्मक काळी शक्ती शरिरात जाण्याचे जणू प्रवेशद्वारच बनते !

‘टॅटूू’च्या विकृतीला दूर ठेवा !

अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेण्याची पाश्‍चात्त्य विकृती भारतीय तरुणांमध्ये रूढ झाली आहे. भारतीय परंपरेत पूर्वी शुभचिन्हे गोंदवण्याची प्रथा होती; मात्र आता ‘टॅटू’ गोंदवण्याची कुप्रथा आली आहे. ‘टॅटू’मुळे घातक संसर्गजन्य रोग पसरतात. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेणे म्हणजे स्वत:तील अहंला खतपाणी घालणे होय.

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई


Multi Language |Offline reading | PDF