पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावापुढील ‘वीर’ शब्द काढला

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा स्वातंत्र्यवीर सावरकरद्वेष !

जयपूर – राजस्थान बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये पालट केला आहे. या पाठ्यपुस्तकांतील ‘वीर सावरकर’ या नावापुढील ‘वीर’ हा शब्द काढला आहे. नव्याने छापण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये हा पालट करण्यात आला आहे. (काँग्रेसने सावरकर यांच्या नावापुढे असलेला ‘वीर’ हा शब्द काढला, तरी त्यांच्या शौर्याला ते कधीही संपवू शकत नाहीत ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी गाजवलेले शौर्य कोट्यवधी भारतियांना नेहमीच प्रेरणादायी ठरलेे आहे आणि हे काँग्रेस कधीही नष्ट करू शकत नाही ! – संपादक)

‘सेल्युलर जेलमध्ये सावरकरांचा छळ करण्यात आला’, ‘सावरकरांनी स्वतःला ‘सन ऑफ पोर्तुगाल’ असे म्हटले होते’, ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना सावरकरांनी पुढे आणली’, ‘भारत छोडो’ या चळवळीला सावरकरांनी विरोध केला’, ‘पाकिस्तानच्या निर्मितीला सावरकरांचा विरोध होता’, असे या पाठ्यपुस्तकांत म्हटले गेले आहे.


Multi Language |Offline reading | PDF