बलात्काराच्या प्रकरणात जामिनावर असलेले केरळमधील माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावरील व्यंगचित्रावर ‘केरळ कॅथॉलिक बिशप परिषदे’चा आक्षेप

पुरस्काराविषयी केरळ सरकार पुनर्विचार करणार !

  • शबरीमला प्रकरणात हिंदूंच्या धर्मभावना लाथाडणारे केरळमधील साम्यवाद्यांचे हिंदुद्वेषी सरकार ख्रिस्त्यांसमोर मान झुकवते, हे लक्षात घ्या !
  • मुलक्कल यांच्यावरील व्यंगचित्रामुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी आवाज उठवणार्‍या ‘केरळ कॅथॉलिक बिशप परिषदे’ने मुलक्कल यांच्या घृणास्पद कृत्याचा कधी निषेध केला आहे का ?

थिरूवनंतपूरम् – ननवरील बलात्काराच्या प्रकरणी सध्या जामिनावर असलेले केरळमधील माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर काढलेल्या एका व्यंगचित्रावर ‘केरळ कॅथॉलिक बिशप परिषदे’ने तीव्र आक्षेप घेतला आहे. व्यंगचित्रकार के.के. सुभाष यांनी काढलेल्या या व्यंगचित्राला केरळ राज्य सरकारच्या ‘केरळ ललित कला अकादमी’कडून ‘सर्वोत्कृष्ट चित्रा’चा पुरस्कार घोषित करण्यात आला. बिशप परिषदेच्या या आक्षेपानंतर  राज्य सरकारने, तसेच त्याच्या ‘केरळ ललित कला अकादमी’ने सदर व्यंगचित्राला दिलेल्या पुरस्काराचा पुनर्विचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या चित्रात मुलक्कल यांना कोंबड्याच्या रूपात दाखवण्यात आले आहे. या चित्रात एकीकडे मुलक्कल यांच्या हातात असलेल्या ख्रिस्त्यांच्या धार्मिक वस्तूवर महिलांचे अंतर्वस्त्र दाखवण्यात आले आहे, तर दुसरीकडे मुलक्कल यांनी केलेले अत्याचार उघड करणार्‍या नन्स पळून जातांना दाखवण्यात आले आहे. चित्रातील वरच्या बाजुला ‘विश्‍वसम रक्षति ।’ (तुमचा विश्‍वास तुम्हाला वाचवू शकतो), असे लिहिले आहे. याशिवाय या व्यंगचित्रात मुलक्कल यांचे समर्थन करणारे आमदार पी.सी. जॉर्ज, तसेच लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपी असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पी.के. शशी यांनाही दाखवण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF