‘पितांबरी उद्योग समूह’, ‘सुहाना मसाला’ आणि ‘अमृत मलम’ यांच्याकडून सावरकरद्वेष्ट्या ‘एबीपी माझा’ला विज्ञापने देणे बंद !

‘एबीपी माझा’ने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

  • ‘कॉटन किंग’ आस्थापनानंतर या सर्व आस्थापनांचा स्तुत्य निर्णय !
  • हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु समाज यांच्या विरोधात प्रत्येक वेळी गरळओक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला समस्त हिंदूंनी आणि राष्ट्रप्रेमींनी एकप्रकारे लोकशाही मार्गाने धडाच शिकवला आहे. राष्ट्रप्रेमी आणि हिंदुप्रेमी जागृत झाल्यावर ते काय करू शकतात, याची ही झलक आहे ! धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांची नाहक नालस्ती करणार्‍या अन्य वृत्तवाहिन्यांनी यातून बोध घ्यावा !

मुंबई, १४ जून (वार्ता.) – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : नायक कि खलनायक’ हा कार्यक्रम आयोजित करून क्रांतीकारकांचे मेरूमणी म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करणार्‍या ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीला यापुढे विज्ञापने न देण्याचा निर्णय ‘पितांबरी उद्योग समूह’, ‘सुहाना मसाला’, ‘अमृत मलम’ या उत्पादनांच्या मालकांनी केला आहे. यापूर्वी ‘कॉटन किंग’च्या आस्थापनाने असा निर्णय घेतला होता.

‘एबीपी माझा’च्या विरोधातील ‘ट्विटर’वरील ‘हॅश टॅग’ला भारतात पहिला, तर जगात चौथा क्रमांक !

सावरकरद्वेष्ट्या ‘एबीपी माझा’च्या विरोधात सामाजिक माध्यमातही जोरदार मोहीम

मुंबई, १४ जून (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या विरोधात ‘ट्विटर’वर ‘#BoycottABPAdvertisers’ हा हॅश टॅग चालवला. या ‘हॅश टॅग’ भारतात पहिल्या, तर जगात चौथ्या क्रमांकावर पोचला. १३ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता या ‘हॅश टॅग’ला प्रारंभ झाला. या ‘हॅश टॅग’ला जगभरातील राष्ट्रप्रेमी लोकांनी दिलेल्या प्रतिसादाविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रप्रेमींचा ‘एबीपी माझा’च्या विरोधात वाढता असंतोष !

‘एबीपी माझा’ ने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करणारा कार्यक्रम प्रदर्शित केल्यावर समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला; मात्र त्यानंतरही ‘एबीपी माझा’ने क्षमायाचना करण्याचे औदार्य दाखवले नाही. (एरव्ही चर्चासत्रांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना प्रश्‍नांचा भडीमार करून कोंडीत पकडून त्यांचे मानसिक खच्चीकरण करू पहाणार्‍या ‘एबीपी माझा’ने स्वतः घोडचूक केल्यावर मात्र मूग गिळून गप्प बसते ! जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांचा अवमान करायचा आणि नंतरही क्षमा मागायची नाही, हे ‘एबीपी माझा’चे  उद्दामपणाचे लक्षण आहे ! – संपादक)

त्यामुळे राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये ‘एबीपी माझा’विषयीचा असंतोष अधिकच तीव्र झाला. त्यातून ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर बहिष्कार टाकणे, तसेच त्यांना मिळणारी विज्ञापने बंद करण्याचे आवाहन करून आर्थिक स्रोत बंद करणे या मोहिमा राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे राबवण्यात येत आहेत. (राष्ट्रहानीच्या विरोधात संघटित आणि कृतीशील होणार्‍या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन ! – संपादक)

पितांबरी उद्योग समूहाच्या मालकांचे ब्राह्मण जागृती सेवा संघाकडून आभार !

विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. रवींद्र प्रभुदेसाई (डावीकडे) यांनी लगेचच या जाहिराती बंद करणार असल्याचे जाहीर केले तसेच इथून पुढे एकही जाहिरात ABP ला देणार नसल्याचे सांगितले

ब्राह्मण जागृती सेवा संघाचे अध्यक्ष श्री. अंकित काणे यांनी पितांबरी उद्योगसमूहाचे मालक आणि संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. प्रभुदेसाई यांनी त्वरित ‘एबीपी माझा’ला विज्ञापने न देण्याचा निर्णय घेतला. याविषयीचे पत्रही त्यांनी श्री. अंकित काणे यांच्याकडे सुपुर्द केले. ‘एबीपी माझा’ला विज्ञापने देण्याचे बंद करण्याचा निर्णय घेऊन श्री. अंकित काणे यांनी श्री. रवींद्र प्रभुदेसाई आणि पितांबरी समूह यांचे आभार मानले आहेत

देवरुख (रत्नागिरी) येथील २०० हून अधिक सावरकरप्रेमींनी ‘एबीपी माझा’ला ‘अनसबस्क्राईब’ करून वृत्तवाहिनीवर घातला बहिष्कार

रत्नागिरी जिल्ह्यातही ‘एबीपी माझा’च्या विरोधात राष्ट्रप्रेमींची जोरदार मोहीम !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर : नायक कि खलनायक’ या चर्चासत्राचे आयोजन करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन सावरकरप्रेमींकडून करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ‘एबीपी माझा ब्लॉक करा’, ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील २०० हून अधिक सावरकरप्रेमींनी ‘एबीपी माझा’ च्या ‘ऑनलाईन’ चॅनेलला ‘अनसबस्क्राईब’ करून या वृत्तवाहिनीवर बहिष्कार घातला आहे. महाराष्ट्रात अन्यत्रही ही चळवळ जोर धरत आहे.

खेड (रत्नागिरी) येथे ‘एबीपी माझा’चे संपादक, वृत्तनिवेदक, वृत्तनिवेदिका आणि संबंधितांविरुद्ध नागरिकांची कायदेशीर लेखी तक्रार

खेड (रत्नागिरी) येथे १ जून या दिवशी येथील पोलीस ठाण्यात ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, वृत्तनिवेदक प्रसन्न जोशी, वृत्तनिवेदिका नम्रता वागळे आणि संबंधित यांच्या विरोधात श्री. अमेय मालशे, प्रतिष्ठित नागरिक आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी कायदेशीर लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF