देहली सेवाकेंद्रातील साधिका कु. मनीषा माहुर हिला सद्गुरु पिंगळेकाका यांच्याविषयी आलेली अनुभूती

(सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे
कु. मनीषा माहुर

१. सद्गुरु पिंगळेकाका नियोजित दिनांकापूर्वीच देहली सेवाकेंद्रात परत येत असल्याचे स्वप्नात दिसणे आणि दुसर्‍याच दिवशी ते येत असल्याचा निरोप मिळणे

‘ऑगस्ट २०१८ मध्ये सद्गुरु पिंगळेकाका प्रसारदौर्‍यावर गेले होते. तेव्हा त्यांचा परत येण्याचा दिवस निश्‍चित होता. एका रात्री मला स्वप्नात दिसले, ‘काही कारणामुळे सद्गुरु पिंगळेकाका देहली सेवाकेंद्रात परत येत आहेत आणि काही साधिका आनंदाने आपापसात ‘सदगुरु काका सेवाकेंद्रात येतील, तेव्हा सर्व काही ठीक होईल’, असे बोलत आहेत.’ दुसर्‍या दिवशी सकाळी ‘सदगुरु काका दौर्‍याहून देहलीला परत येत आहेत’, असे समजले.

२. सदगुरुकाकांनी सेवाकेंद्रात आल्यावर साधिकेची स्थिती जाणून घेऊन नामजपादी उपाय सांगणे आणि घरी जाण्यास अनुमती न देणे, तेव्हा ‘घरी गेल्यावर स्थिती अधिकच बिघडली असती’, असे वाटून ईश्‍वराप्रती कृतज्ञता वाटणे

त्या दिवसांत माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढला होता आणि माझी स्थिती नकारात्मक होती. सद्गुरुकाका येण्यापूर्वीच मी घरी जाण्याचे ठरवले होते; परंतु मी घरी जाण्यापूर्वीच ते सेवाकेंद्रात आले. मला होत असलेले त्रास पाहून त्यांनी माझ्या स्थितीविषयी जाणून घेतले आणि मला नामजपादी उपाय सांगितले. तेव्हा त्यांनी मला घरी जाण्याची अनुमती दिली नाही. मी घरी गेले असते, तर माझी स्थिती अधिकच बिघडली असती; परंतु ‘वरील सर्व घटना ईश्‍वरनियोजित होत्या’, हे माझ्या लक्षात आले आणि ईश्‍वराप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र


Multi Language |Offline reading | PDF