वाराणसी येथील साधक श्री. निलय पाठक यांना हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय साधना शिबिरात संगीत साधनेसंदर्भातील मार्गदर्शन ऐकतांना आलेल्या अनुभूती

श्री. निलय पाठक

१. संगीताविषयी ऐकतांना कंठ दाटून येणे

‘हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय साधना शिबिरात कु. तेजल पात्रीकर संगीतसाधना या विषयासंदर्भात करत असलेले मार्गदर्शन ऐकतांना ‘माझा कंठ आपोआप दाटून आला आहे’, असे मी अनुभवत होतो.

२. परात्पर गुरुदेवांविषयी ऐकतांना अस्वस्थता निघून जाणे अन् मन:शांतीचा अनुभव घेता येणे

या वेळी कु. तेजलताईंनी ६४ कलांचे महत्त्व सांगितले, तसेच परात्पर गुरुदेवांविषयी सांगतांना त्या म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरुदेव किती प्रयत्न करतात आणि अन्य साधकांच्या माध्यमातून किती प्रयत्न होतात ?’’ त्या वेळी माझ्या संपूर्ण शरिरातील अस्वस्थता निघून गेली आणि मी मन:शांतीचा अनुभव घेत होतो.

३. तानसेनच्या गुरूंचे उदाहरण ऐकतांना डोळ्यांतून भावाश्रू येऊन मन एकाग्र होणे

ताईनी त्यांच्या कला-साधनेचे उदाहरण सांगतांना तानसेनच्या गुरूंचे उदाहरण सांगितले. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले आणि मन एकाग्र झाले.

४. वाईट शक्तींना संगीताचा त्रास होण्याच्या संदर्भातील गायनाचे चलत्चित्र बघतांना मनाची एकाग्रता टिकून रहाणे आणि ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटणे

वाईट शक्तींना संगीताचा त्रास होण्याच्या संदर्भातील आठ प्रयोगांचे भाग दाखवतांना त्यांनी गायनाचे चलत्चित्र दाखवले. त्या वेळी माझ्या मनाची एकाग्रता टिकून होती आणि ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटत होते.

५. घोषणा दिल्यानंतरही मनाची एकाग्रता आणि निर्विचार अवस्था टिकून रहाणे

मार्गदर्शनाच्या शेवटी आम्ही सर्वजण घोषणा देऊ लागलो. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्वांनी घोषणा न देता तो आनंद अनुभवला पाहिजे. घोषणा दिल्यामुळे आनंद टिकून न रहाता आपल्या मनाची स्थिती पालटेल.’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपल्या मनाची निर्विचार अवस्था आणि एकाग्रता ५ ते ६ मिनिटे टिकून आहे.’ परात्पर गुरुदेवांनी मला या अनुभूती दिल्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. निलय पाठक, वाराणसी (८.७.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF