भारतासमवेत अमेरिकेचे संबंध कायमच पुढे जाणारे असावेत ! – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ

  • ‘भारतासमवेतचे संबंध कायम पुढे जाणारे असावेत’, असे अमेरिकेला खरेच वाटत असेल, तर त्याने पाकिस्तानला साहाय्य करण्याऐवजी त्याला ‘आतंकवादी देश’ घोषित करून तेथील आतंकवाद्यांचा मुळासकट नायनाट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !
  • अमेरिकेने पाकला दिलेले एफ् १६ विमान भारताने पाडल्यावर त्याला अमेरिकेने दुजोरा का दिला नाही?, हे पॉम्पिओ यांनी सांगायला हवे !
  • एकीकडे भारताशी पुढे जाणारे संबंध असावेत, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला व्यापारासाठी दिलेला विशेष दर्जा रहित करायचा, अशी दुटप्पी भूमिका अमेरिका का घेते?, हे त्यांनी सांगायला हवे !

नवी देहली – भारतासमवेत अमेरिकेचे संबंध कायमच पुढे जाणारे असावे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी केले आहे. ते ‘इंडिया आयडियाज समिट’ या कार्यक्रमात बोलत होते. लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी भाजपकडून ‘मोदी है तो मुमकीन है’ची घोषणा देण्यात आली होती. त्याचाही उल्लेख पॉम्पिओ यांनी वरील विधान करतांना केले. पॉम्पिओ २४ जून ते ३० जूनपर्यंत भारत, श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांच्या दौर्‍यावर असणार आहेत.

पॉम्पिओ म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक सशक्त होण्यासाठी राजकीय आघाडीवर आम्ही काम करू इच्छितो. त्यामुळे दोन्ही देशांना याचा लाभ होईल. मोदी आणि ट्रम्प सरकार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भविष्यासाठीच्या संधी पाहतो आहोत.


Multi Language |Offline reading | PDF