ओमानमधील १७ भारतीय कैद्यांची सुटका

नवी देहली – ओमानचे सुलतान कुबूस यांनी तेथे शिक्षा भोगत असणार्‍या १७ भारतीय कैद्यांची सुटका केली आहे. त्यांना ईदनिमित्ताने ‘शाही माफी’ देण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ‘भारताच्या मित्र देशाने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो’, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF