सनातन संस्थेच्या कार्यासाठी माझे नियमित सहकार्य असेल ! – चंद्रकांत जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष, सातारा

चंद्रकांत जाधव यांची सनातनच्या धर्मरथ प्रदर्शनाला भेट

श्रीकृष्णाचे भेट दिलेले चित्र हातात घेतलेले डावीकडून (तिसरे) श्री. चंद्रकांत जाधव आणि (चौथे) श्री. गणेश रसाळ

म्हसवड (जिल्हा सातारा), १३ जून (वार्ता.) – सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. हे कार्य दायित्व घेऊन पुढे न्यायला हवे. कार्य पुढे नेण्यासाठी सनातनचे साधक वेळ देतात, ही मोठी गोष्ट आहे. या कार्यासाठी माझे नियमित सहकार्य राहील, असे आश्‍वासन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त दिले. येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाच्या प्रदर्शनाला चंद्रकांत जाधव आणि नगरसेवक गणेश रसाळ यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी म्हसवड येथील सहेली भिशी मंडळाच्या महिलांनी धर्मरथाला भेट दिली. त्यांना सनातनचे लघुग्रंथ पुष्कळ आवडले. त्यांनी मकरसंक्रांतीला वाण देण्यासाठी लघुग्रंथांची मागणीही केली.


Multi Language |Offline reading | PDF