श्री. दत्तात्रेय पिसे यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये 

श्री. दत्तात्रय पिसे

१. तळमळीने भावपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सेवा करणे

‘श्री. दत्तात्रेयदादा यांच्याशी प्रामुख्याने दूरभाषद्वारेच संपर्क येतो. ते सोलापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीअंतर्गत प्रसार, तसेच वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांच्याद्वारे गुरुकार्याच्या प्रसिद्धीची सेवा करतात.

१ अ. सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन, तसेच विविध उपक्रमांसाठी जिल्ह्यातील लहान-मोठ्या नियतकालिकांच्या संपादकांना संपर्क केल्यावर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे : गेल्या वर्षी झालेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी दादांनी तळमळीने संपर्कांची सेवा केली. सोलापूर जिल्ह्यातील अनेक लहान-मोठ्या नियतकालिकांना शोधून त्यांच्या संपादकांना त्यांनी तळमळीने संपर्क केले. त्याला अनेक संपादकांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या संदर्भात सांगत असतांना त्यांच्या बोलण्यातून गुरुकार्याविषयी तीव्र तळमळ आणि भाव जाणवत होता. यासमवेतच त्यांच्याकडून कर्तेपणा गुरुचरणी अर्पण होत असल्याचेही सहज लक्षात येत होते.

१ आ. विविध जिल्हास्तरीय वृत्तवाहिन्यांच्या संपादकांशी जवळीक साधल्याने त्यांनी वाहिन्यांवरून गुरुकार्याचा प्रसार करणे : विविध जिल्हास्तरीय वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनाही त्यांनी चांगल्या रितीने जोडले आहे. त्यामुळे गुरुकार्याच्या प्रसारार्थ वृत्तवाहिन्यांचा चांगल्या प्रकारे हातभार लाभत आहे. यामागे दत्तात्रेयदादांतील गुरुकार्याप्रती असलेली तीव्र तळमळ, भाव आणि संपर्क करण्याचे कौशल्य असल्याचे लक्षात आले.

२. नम्रता

दत्तात्रेयदादा नेहमी अतिशय नम्रतेने बोलतात. ‘नम्रता कशी असावी ?’, हे त्यांच्याकडून शिकावे’, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

३. गुरूंप्रती श्रद्धा

दत्तात्रेयदादा सनदी लेखापाल (सी.ए.) असून त्यांचे १ सहस्राहून अधिक असामी (क्लायंट) आहेत. त्यांनी सर्व कामे त्यांच्याकडे असणार्‍या ४ – ५ कर्मचार्‍यांना शिकवून ठेवले आहे. त्यामुळे गेली काही वर्षे ते गुरुकार्य अव्याहतपणे करू शकत आहेत. ‘गुरूंप्रती असलेल्या श्रद्धेमुळेच ते निर्धास्त राहून गुरुसेवा करू शकत आहेत’, असे वाटते.

४. स्वत:ला पालटण्याची तळमळ असणे

दादा ‘मी कुठे न्यून पडतो ?’, असे वेळोवेळी विचारतात. साधनेत साहाय्य करण्यासाठी ते सहसाधकांना सांगतात. मनाची प्रक्रिया सांगून ‘दृष्टीकोन कसा ठेवायला हवा ?’, असे विचारतात.

श्री. दत्तात्रेयदादांतील ईश्‍वरी गुण आमच्यातही येवोत’, अशी श्रीमद् नारायणस्वरूप गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्रीगुरुचरणी,

श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF