अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या पाठीशी विष्णुस्वरूपी भगवंताचे आशीर्वाद अन् कृपा असल्याने ‘या षड्यंत्रातून ते निश्‍चित सुटणार’, हे त्रिवार सत्य !

‘काल रात्री उशिरा माझ्या वाचनात आले की, एक षड्यंत्र रचून अधिवक्ता संजीव पुनाळेकर, तसेच श्री. विक्रम भावे यांना अटक करण्यात आली आहे. हे कळल्यावर आधी मला वाईट वाटले; पण नंतर भगवंताने विचार दिला, ‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अन्य कोणत्याच अधिवक्त्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर हे स्वतःचा खटला स्वतः लढायचे, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय पुनाळेकर आहेत.’ यात भर म्हणजे त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष भगवंताचे आशीर्वाद आणि कृपा आहे. यांमुळे ते यातून सुटणारच आहेत, हे त्रिवार सत्य !

सौ. माधवी घाटे

हे देवा, ही सर्व तुझी लीला आहे, तसेच तीव्र आपत्काळाची झलकही ! तू सर्व साधकांच्या पाठीशी आहेस, यावर पूर्ण श्रद्धा आहे.’- सौ. माधवी किशोर घाटे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२६.५.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक  


Multi Language |Offline reading | PDF