आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या वेळी अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. सोहळा पहाण्यापूर्वी

१ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने सकाळपासूनच पुष्कळ चैतन्य मिळून ते ग्रहण करत असल्याचे जाणवणे आणि आनंद अन् उत्साह यांत वाढ झाल्याचे अनुभवणे : ‘११.५.२०१९ या दिवशी सकाळी उठल्यापासून ‘मला गुरुदेवांच्या कृपेमुळे पुष्कळ ऊर्जा मिळत असून आजूबाजूला पुष्कळ चैतन्य आहे आणि मी ते ग्रहण करत आहे’, असे मला जाणवत होते. सकाळपासूनच माझ्या आनंदात आणि उत्साहात वाढ झाली असल्याचे मी अनुभवत होते; परंतु याचे कारण माझ्या लक्षात येत नव्हते. दुपारी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने होणारा सोहळा पहाण्यास गेले. त्या वेळी मला त्याचा उलगडा झाला. त्या दिवशी परात्पर गुरुदेवांचे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने मला तसे अनुभवायला मिळत होते.

१ आ. आरतीच्या वेळी ध्यानमंदिरात परात्पर गुरुदेव सिंहासनावर विराजमान झाले असून सद्गुरु (सौ.) बिंदाताई सर्वांना आरती ग्रहण करण्यास देत असल्याचे जाणवणे : मी सकाळी सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात आरतीला उभी होते. तेव्हा मला ‘परात्पर गुरुदेव सिंहासनावर विराजमान झाले आहेत’, असे दिसत होते. आरती झाल्यानंतर मला सद्गुरु (सौ.) बिंदाताई दिसल्या आणि ‘त्या सर्वांना आरती ग्रहण करण्यास देत आहेत’, असे वाटले.

२. सोहळा पहातांना

२ अ. श्री सत्यनारायण आरतीच्या वेळी परात्पर गुरुदेवांमध्ये ३३ कोटी देवता असून त्यांच्याकडून देवतांचे आवश्यक ते तत्त्व सप्तरंगी किरणांच्या रूपात सर्व साधकांपर्यंत जात असल्याचे जाणवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा पहातांना ‘मी कोणत्या तरी वेगळ्या लोकात आहे’, असे मला वाटत होते. श्री सत्यनारायणाची आरती चालू असतांना ‘परात्पर गुरुदेवांकडून सप्तरंगी किरण येत आहेत आणि ते सर्व साधकांपर्यंत जात आहेत’, असे मला जाणवले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात ३३ कोटी देवता आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येकाला आवश्यक ते तत्त्व मिळत आहे. त्यासाठी विविध देवतांच्या तत्त्वाचे प्रतीक म्हणून मला सप्तरंगी किरण दिसत आहेत’, असे मला वाटले.

२ आ. सोहळा देवलोकात होत असून उपस्थित सद्गुरु आणि संत देवताच असल्याचे वाटणे : ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून तो देवलोकात होत आहे’, असे मला वाटत होते. सोहळ्याला समोर बसलेले सर्व सद्गुरु आणि संत या देवताच आहेत आणि ‘त्यांच्या उपस्थितीत हा दिव्य सोहळा चालू आहे’, असे मला वाटले. हे सर्व अनुभवतांना माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती.

२ इ. सोहळा पहतांना भावजागृती होऊन उजव्या डोळ्यातून गालावर भावाश्रू ओघळणे, तर डाव्या डोळ्यातील अश्रू खाली न ओघळता कडांशीच थांबणे : सोहळा पहातांना माझी अखंड भावजागृती होत होती. त्या वेळी माझ्या उजव्या डोळ्यातून भावाश्रू गालावर ओघळत होते, तर डाव्या डोळ्यातील अश्रू खाली न येता ते तेथेच (डोळ्याच्या कडांशी) थांबत होते. असे मी पहिल्यांदाच अनुभवत होते.

२ ई. श्री. विनायक शानभाग गुरुदेवांना आत्मनिवेदन करत असतांना ‘प्रत्येक साधकाच्या हृदयातील शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहेत’, असे वाटत होते.

२ उ. रामनाथी आश्रमात संपन्न झालेल्या यागांच्या विधींची ध्वनीचित्रफीत पहात असतांना ‘सर्व विधी माझ्या समोरच चालू आहेत’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला २ वेळा फुलांचा मंद सुगंध आला.

गुरुदेवा, या दिव्य सोहळ्यातील हे सर्व भावक्षण तुमच्या कृपेनेच अनुभवता आले. ते मी तुमच्या चरणी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करते.’

– गुरुचरणी,

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, मंगळूरू सेवाकेंद्र (११.५.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 


Multi Language |Offline reading | PDF