‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’च्या प्रथम दिवसाचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आयोजित अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांतर्भूत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’च्या प्रथम दिवसाचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

व्यासपिठावर डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (मार्गदर्शन करतांना), सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. नीलेश सिंगबाळ

हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गोवा येथील रामनाथ देवस्थानातील सभागृहामध्ये चार दिवसांचे ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या प्रथम दिवसाचे, म्हणजे ५.६.२०१९ या दिवसाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

श्री. निषाद देशमुख

१. परिसंवाद – हिंदु राष्ट्र आणि लव्ह जिहाद (प्रायोगिक सत्र)

अ. ‘धर्मप्रेमी पुढाकार घेऊन सरावासाठी व्यासपिठावर येऊन बसल्यावर ईश्‍वराची कृपा त्यांच्यावर अधिक प्रमाणात होत होती, असे जाणवले.

आ. सर्व धर्मप्रेमींमध्ये असलेल्या शिकण्याच्या तळमळीमुळे ईश्‍वराचे चैतन्य वायूमंडलात कार्यरत होत होते. चैतन्याच्या स्वरूपात ईश्‍वरच परिसंवाद घडवत असल्याने सर्व धर्मप्रेमींच्या मनातील विविध स्वभावदोष, उदा. सतर्क न रहाणे, विषय सोडून बोलणे आणि त्यामुळे होणार्‍या चुका विविध प्रसंगांतून ईश्‍वर त्यांना दाखवत होता.

इ. ईश्‍वर सर्व प्रकारांची सिद्धता त्यांच्याकडून करवून घेत त्यांच्यातील चैतन्याची जागृती करत असल्याने वाईट शक्तीही त्यांच्या कार्यात अडथळे आणण्यासाठी सूक्ष्मातून आक्रमणे करत होत्या.

ई. ईश्‍वराला चुका स्वीकारणारे आणि स्वतःमध्ये पालट करणारे आवडतात. यामुळे ज्या वेळी धर्मप्रेमींनी त्यांच्याकडून झालेल्या विविध चुका स्वीकारल्या, त्या वेळी ईश्‍वराच्या कृपेने त्यांचे कष्ट, प्रारब्ध अल्प झाले आणि त्यांना अधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण करता आले.’

२. सर्व संतांच्या (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. नीलेश सिंगबाळ इत्यादींच्या) एकत्रित अस्तित्वाचा परिणाम

अ. ‘व्यासपिठावर उपस्थित असलेल्या संतांच्या माध्यमातून तारक आणि मारक या दोन्ही प्रकारच्या शक्ती वायूमंडलात प्रक्षेपित होत होत्या.

आ. संत आणि सद्गुरु यांच्या अस्तित्वामुळे निर्गुण अन् सगुण दोन्ही स्तरांवरील शक्ती उपस्थित धर्मप्रेमींच्या दिशेने प्रक्षेपित होत होती.

इ. संत आणि सद्गुरु यांच्या चैतन्यमय अस्तित्वातून वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या धर्मप्रेमींवर चैतन्य प्रक्षेपित होऊन त्यांचे त्रास अल्प होत होते अन् त्यांची कुंडलिनीचक्रे जागृत होत होती.

ई. संत आणि सद्गुरु यांच्या एकत्रित चैतन्यमय अस्तित्वामुळे उपस्थित धर्मप्रेमींच्या आध्यात्मिक पातळीत तात्कालिक काळासाठी २ टक्के वृद्धी झाली होती. (सर्वसाधारणतः संतांच्या सत्संगामुळे आध्यात्मिक पातळीत १ टक्का वाढ होते.)

३. धर्मप्रेमींची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

अ. सर्वच धर्मप्रेमींच्या मनावर साधनेचे संस्कार होत होते. त्यांना क्षमायाचना करायला सांगितल्यावर सर्वांनी तळमळीने क्षमायाचना केली आणि इतरांच्या चुकाही सांगितल्या. यामुळे समष्टी भावात ५ टक्के वाढ झाल्याने वायुमंडलात सकारात्मक पालट झाले होते.

आ. धर्मप्रेमींच्या मनातील तळमळीमुळे विविध चुका दाखवून ईश्‍वर त्यांची शुद्धी करून त्यांना समष्टी साधनेसाठी पात्र करत होता.

४. उद्बोधन सत्र – व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे धर्मसंस्थापनेच्या दृष्टीने महत्त्व आणि धर्मप्रेमींना झालेले लाभ

४ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ मार्गदर्शन करतांना लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१. ‘सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी मार्गदर्शन केल्यावर त्यांच्या वाणीतून प्रक्षेपित होणारे क्षात्रतेज थेट साधकांच्या मनातील स्वभावदोषांना लागून ते नष्ट होत होते.

२. सद्गुरु (सौ.) बिंदाताई मार्गदर्शन करतांना त्यांचे बाह्यमन इतरांच्या मनाशी एकरूप होते, तर त्यांचे अंतर्मन ईश्‍वराशी एकरूप होते. त्या अनुसंधानात आणि ध्यानावस्थेत असतात. त्यांच्या अशा विशिष्ट अवस्थांमुळे त्यांना धर्मप्रेमी, साधक किंवा इतरांच्या मनातील स्वभावदोष, विचार असे अचूक ओळखून त्या संदर्भात ईश्‍वराला अपेक्षित असे योग्य दृष्टीकोन सांगता येतात.

३. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी केलेल्या मार्गदर्शनातून प्रथम चैतन्य, नंतर भाव आणि पुढे शक्ती या क्रमाने शक्ती प्रक्षेपित झाली. या क्रमाने होणार्‍या प्रगटीकरणातून पुढील प्रक्रिया घडतांना लक्षात आली.

अ. सद्गुरु बिंदाताईंकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे धर्मप्रेमींकडून झालेल्या चुका, त्यांमागील स्वभावदोष आणि त्यामुळे निर्माण झालेली त्रासदायक स्पंदने यांच्यावर परिणाम होऊन त्यांचे प्रमाण अल्प होत होते. या प्रक्रियेत मारक शक्ती कार्यरत न रहाता चैतन्य कार्यरत असल्याने धर्मप्रेमी जिवांना मानसिक स्तरावर त्रास न होता आनंद मिळत होता.

आ. चैतन्याचे कार्य पूर्ण झाल्यावर सद्गुरु बिंदाताईंकडून भावाच्या स्तरावर कार्य होणे चालू होते. त्यांच्या भावपूर्ण मार्गदर्शनामुळे उपस्थित धर्मप्रेमींच्या मनात भावाचे संस्कार दृढ होऊन त्यांना स्वभावदोषांशी लढण्याची शक्ती मिळाली. या अनुभूतीमुळे त्यांच्या मनावर साधनेचे आणि सद्गुणांचे संस्कार झाले असल्याचे लक्षात येते.

इ. सर्वांना भावपूर्ण मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी सर्वांकडून सामूहिक क्षमायाचना करण्याची कृती करून घेतली. ही कृती करण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्याकडून शक्ती प्रक्षेपित होत होती. या शक्तीमुळे सर्व धर्मप्रेमींचे मन आणि बुद्धी यांना साधना करण्याची शक्ती मिळत होती.

यांतून सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या मार्गदर्शनातून मोठ्या प्रमाणावर अडचणी सुटण्याची प्रक्रिया लक्षात आली.

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०१९, रात्री ११)


Multi Language |Offline reading | PDF