६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रामनाथी, गोवा येथील कु. आर्य जोशी (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आर्य जोशी हा एक आहे !

कु. आर्य जोशी

(वर्ष २०१७ मध्ये कु. आर्यची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. – संकलक)

एका सेवेच्या निमित्ताने श्री. रविकांत शहाणे आणि सौ. मनाली भाटकर चिपळूण केंद्रात गेले होते. त्या वेळी श्रीमती सुनीता चितळे यांच्याकडे त्यांची निवास व्यवस्था होती. त्यांचा नातू कु. आर्य जोशी याच्याकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत. (आता श्रीमती सुनीता चितळे आणि त्यांचा नातू कु. आर्य रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात रहातात. – संकलक)

१. उत्साही

कु. आर्यकडे पाहिल्यावर त्याच्यातील वेगळेपण लक्षात येते. त्याचा उत्साह पाहून आपल्यालाही उत्साह येतो. – सौ. मनाली भाटकर, रत्नागिरी

२. व्यवस्थितपणा

आम्ही श्रीमती चितळे यांच्या घरी पोहोचलो. त्या वेळी कु. आर्य शाळेतून सांगितलेला चित्रकलेचा प्रकल्प सिद्ध करत असावा, असे माझ्या लक्षात आले. त्याने सर्वप्रथम आपले सर्व साहित्य आवरून ठेवले आणि त्यानंतर तो आमच्याशी बोलण्यासाठी समोरील सुखासनावर बसला.

३. प्रामाणिकपणा

आर्यची अभ्यास पूर्ण करण्याची तळमळ वाखाणण्याजोगी होती. गणिते सोडवतांना अंकांची बेरीज करायची होती. त्या वेळी गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) घेण्याचा विचार त्याच्या मनात आला. तो त्याने बोलून दाखवला आणि लगेच म्हणाला, असे केल्याने चीटिंग होईल. ते नकोच. त्याने मनाने बेरीज केली. गणितातील संख्या २ सहस्र, १ सहस्र ५००, ११६ आणि ६६ अशा होत्या.

४. जिज्ञासू वृत्ती

या वयात समाजातील मुले दूरचित्रवाणीवरील विनोदी अथवा अन्य मालिका पहातांना दिसतात. आर्यने मात्र आम्हाला आपली वेगळीच ओळख दिली. त्याला बालसंस्कारचे संकेतस्थळ उघडायचे होते. त्याला त्या लिंकचे स्पेलिंग येत नव्हते. ते त्याने मला विचारले. माझ्या हातात सनातन वही होती. त्याने त्या वहीवरील लिंक बघितली आणि ही बघा. इथे आहे, असे म्हणून त्याने ती लिंक घेतली. नंतर त्याला शिवाजीचे स्पेलिंग हवे होते. ते मला विचारले आणि तो शिवाजीच्या बालकथा पाहू लागला.

५. शाळेत त्याला आदर्श विद्यार्थी म्हणून परितोषिके मिळाली आहेत.

– श्री. रविकांत शहाणे, रत्नागिरी

६. प्रेमभाव

त्याने आम्हाला यापूर्वी पाहिलेही नव्हते; परंतु आम्ही त्याच्या घरातलेच आहोत, अशा प्रकारे तो आमच्याशी आपलेपणाने वागत होता.

७. इतरांचा विचार करणे

अ. त्याला शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या चित्रफिती (क्लिप्स) संगणकावर पहायच्या होत्या; परंतु त्याने त्यापूर्वी मला विचारले, काकू, तुम्हाला सेवेसाठी संगणक लागणार आहे का ? मी नाही म्हटल्यावर त्याने संगणकावर बालसंस्कारचे संकेतस्थळ उघडले.

आ. मी माझा भ्रमणभाष भारित करण्यासाठी लावला होता. त्या ठिकाणी त्याला संगणक चालू करण्याची पिन लावायची होती; परंतु त्याने माझा भ्रमणभाष तेथून काढण्यापूर्वी मला विचारले, काकू, तुमचा भ्रमणभाष दुसरीकडे भारित करण्यासाठी लावला, तर चालेल का ?

– सौ. मनाली भाटकर

८. विचारण्याची वृत्ती

त्याने शाळेतील प्रकल्पासाठी एक चित्र बनवले होते. चित्राचा बाहेरचा उर्वरित भाग कापून द्याल का ?, असे आर्यने मला विचारले. मी हो, असे म्हटल्यावर त्याने आजीकडे जाऊन विचारले, आजोबांकडून कागद कापून घेऊ का ?

९. चिकाटी

शाळेत सांगितल्याप्रमाणे त्याने इंग्रजी अक्षरांच्या चित्राचा प्रकल्प कार्डबोर्डवर सिद्ध केला होता. प्रथम अक्षरे लिहिण्यासाठी त्याने मोठे गोल काढले; परंतु त्याच्या लगेच लक्षात आले, एवढे मोठे गोल काढले, तर सगळी अक्षरे बसणार नाहीत. नंतर त्याने पालट करून सर्व अक्षरे बसू शकतील, असे गोल काढले आणि ते रेषांनी जोडले. हे करत असतांना त्या गोलांना दोन्ही बाजूंनी सरळ रेषा मारण्याएवढी फूटपट्टी त्याच्याजवळ नव्हती, तरीही त्याने त्याच्याकडे असलेल्या पट्टीचा वापर करून दोन्ही बाजूंना न्यूनतम दोन फूट लांबीच्या ज्या रेषा मारल्या होत्या, त्या कौतुक करण्याएवढ्या सरळ होत्या.

१०. सात्त्विक गोष्टींची आवड

अ. मी भावजागृतीसाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची देहशुद्धीची ध्वनीचकती ऐकत होतो. त्या वेळी तो काहीतरी करत होता. माझी ध्वनीचकती ऐकून पूर्ण झाल्यावर तो माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, आजोबा, ही देहशुद्धी शेअर इटने मला द्याल का ?

आ. त्याने सनातन पंचांगावरील गणपतीचे चित्र त्याच्या वहीवर सुंदररित्या काढले आहे.

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

आम्ही दोघे त्याच्याशी आणि आजीशी बोलत असतांना शाळेतील विषय चालू होता. तेव्हा तो म्हणाला, पुढच्या वर्षी नवीन पुस्तके, वह्या; नवीन शाळा आणि जागा अन् मित्रसुद्धा नवीनच असणार. त्यावर मी त्याला म्हटले, नवीन जागेत जाणार का ? तो म्हणाला, गोव्याला. त्यावर आजी म्हणाली, बघूया. तेव्हा तो लगेच म्हणाला, डॉक्टरबाबांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितले आहे. त्यांचे ऐकायचे आहे.

– श्री. रविकांत शहाणे, रत्नागिरी (जानेवारी २०१८)

१२. स्वभावदोष

ऐकण्याची वृत्ती नसणे, हट्टीपणा आणि रागीटपणा

– श्रीमती सुनीता चितळे (आजी), चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (जानेवारी २०१८)


Multi Language |Offline reading | PDF