(म्हणे) ‘अटक न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लेखी आश्‍वासन दिले तरच भारतात परतेन !’

‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशी वृत्ती असलेला आतंकवादी डॉ. झाकीर नाईक याचे विधान

अशा आतंकवाद्याला तो असेल तेथून त्याच्या मुसक्या आवळून फासावर लटकवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांंनी वेळीच कठोर पावले उचलली असती, तर आज या आतंकवाद्याकडून अशी भाषा ऐकण्याची पाळी आली नसती !

मुंबई – ‘भारतात परतल्यास मला अटक केली जाणार नाही आणि दोषी ठरवेपर्यंत कारागृहात पाठवले जाणार नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाने लेखी दिले, तरच मी भारतात परतेन, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय आतंकवादी हिंदुद्वेषी आणि जिहादी इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडीकडून) डॉ. झाकीर नाईक याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून त्याच्या विरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीसही काढण्यात आली आहे. सध्या डॉ. झाकीर नाईक मलेशिया येथे वास्तव्य करत असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत प्रयत्नशील आहे.

या प्रसिद्धीपत्रकामध्ये डॉ. झाकीर नाईक याने म्हटले आहे की, भारतीय अन्वेषण यंत्रणा राजकीय नेत्यांच्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यास एवढ्या उतावीळ का झाल्या आहेत ? त्यांचा हा उतावळेपणा लज्जास्पद आहे. त्यांच्या अन्वेषणाची दिशा सतत पालटत आहे. आतंकवादावरून त्यांचे अन्वेषण आता आर्थिक गैरव्यवहारावर येऊन थांबले आहे. यातूनच त्यांची राजकीय नेत्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्याची धडपड दिसून येत आहे. कुठल्याही खटल्याविना आणि माझी बाजू ऐकल्याविना मला कारागृहात टाकण्यासाठी धडपड चालू आहे. भारत सरकारने माझ्यावर केलेले आरोप ‘इंटरपोल’ने मान्य करण्यास नकार दिलेला आहे. माझ्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय अन्वेषण यंत्रणांच्या प्रयत्नांना अपयश आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now