अशा माणुसकीशून्य पोलिसाचे केवळ निलंबन नको, तर अशांना कामावरून कायमचे काढून टाकून त्यांची कारागृहात रवानगी केली पाहिजे !

संवेदनाशून्य पोलीस !

‘लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे १८ जानेवारी २०१९ या दिवशी गुडम्बा भागातील एका लाकडाच्या वखारीत घडलेल्या दुर्घटनेत आकाश यादव (वय २० वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची तक्रार नोंदवण्यासाठी त्याची ७५ वर्षीय आजी पोलीस ठाण्यात गेली. त्या वेळी तक्रार नोंदवून घेण्यासाठी तिला ठाणे अंमलदार तेजप्रताप सिंह यांचे पाय धरून त्यांना विनवणी करावी लागली. ती विनवणी करत असतांना सिंह हे खुर्चीत राजेशाही थाटात दोन्ही हात डोक्याच्या मागे धरून बसले होते. या घटनेची ध्वनीचित्रफीत पहाताच पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी सिंह यांना निलंबित केले.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF