ब्रिटनमध्ये खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा विस्तार होण्यासाठी पाकच्या आयएस्आयकडून प्रयत्न

  • पाकला नष्ट केल्याविना भारतातील सर्व प्रकारचा आतंकवाद नष्ट होणार नाही, हे यातून पुन्हा उघड होते !
  • गेली कित्येक शतके मुसलमान आक्रमकांनी शिखांवर क्रूर अत्याचार करून त्यांना ठार मारले. स्वधर्म टिकवण्यासाठी, तसेच भारतभूमीच्या रक्षणासाठी शिखांनी प्राणांची आहुती दिली. हा पराक्रमी इतिहास पुस्तकांतून मांडला असता, तर शीख बांधव आयएस्आयच्या खोट्या प्रसाराला बळी पडले नसते ! आतातरी खलिस्तानी चळवळ मुळापासून नष्ट करण्यासाठी भाजप सरकार हा शौर्यशाली इतिहास पाठ्यपुस्तकातून सांगणार आहे का ?
  • पंजाबमध्ये, तसेच विदेशातही फुटीरतावादी खलीस्तानवादी संघटना कार्यरत असल्याचे अनेके पुरावे असतांना भारतातील सर्वपक्षीय सरकारांनी त्यांचा निःपात करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत !

नवी देहली – ब्रिटनमध्ये खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’चा विस्तार होण्यासाठी पाकची गुप्तचर संघटना आयएस्आय प्रयत्न करत आहे. या आतंकवादी संघटनेचे ब्रिटनमध्ये जाळे पसरवण्यासाठी आयएस्आय मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करत आहे. भारताच्या गुप्तचर विभागाने ही माहिती दिली आहे.

ब्रिटनमधील शिखांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न !

भारतीय गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार या संघटनेने ब्रिटनच्या बर्मिंगहम, डर्बी, कॉवेंट्री आदी ठिकाणी हातपाय पसरले आहेत. ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी नोकरी अथवा उद्योग या निमित्ताने भारतीय शीख वास्तव्य करत आहेत. त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय गुप्तचरांना संशय आहे की, ही संघटना ब्रिटनमधील शिखांच्या अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कार्यरत आहे. ब्रिटनमध्ये सक्रीय झालेल्या या आतंकवाद्यांना हाताशी धरून पंजाबमध्ये आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे.

ब्रिटनमधील पाकच्या कारवायांवर नियंत्रण नाही !

आयएस्आय सामाजिक माध्यमांचा वापर करून शिखांना भारताच्या विरोधात भडकावत आहे. काही आठवड्यांपूर्वी बनावट कागदपत्रे प्रसारित करून ‘भारतीय सैन्यदल शीख सैनिकांवर लक्ष ठेवत आहे’, असा अपप्रचार करण्यात आला. यासाठी ब्रिटनमध्ये असलेली फुटीरतावादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चे साहाय्य घेण्यात आले होते. या अपप्रचाराला बळी पडून जगभरात भारतीय सैन्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. अशा खोट्या प्रचारामुळे भारतीय सैन्यालाही पुढे येऊन ‘हे वृत्त खोटे आहे’, असे सांगावे लागले होते. ब्रिटनमध्ये आयएस्आयच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत. भारताने वारंवार तेथील सरकारला याविषयी माहिती देऊनही ब्रिटन सरकारने त्याकडे कानाडोळा केला आहे. (ही आहे भारताची विदेशातील पत ! भाजप सरकार ब्रिटनला समजेल अशा भाषेत ही समस्या का सांगत नाही ? – संपादक)

शिखांची फुटीरतावादी संघटना पाकमध्ये कार्यरत !

पाकने ‘सिख फॉर जस्टिस’चे लाहोर येथेही कार्यालय उघडले आहे. याद्वारे पाकमधील करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणार्‍या भारतीय शिखांचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संघटनेचे जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या जमात उद दावाशीही संबंध असून अलीकडेच दोन्ही संघटनांची बैठकही घेण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF