गुरुग्राम (हरियाणा) येथील उद्योगपती सुनील कटारिया यांच्याकडून धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन !

असे उद्योगपती हेच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !

श्री. सुनील कटारिया

गुरुग्राम (हरियाणा) – येथील उद्योगपती, तसेच प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. सुनील कटारिया हे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. गुरुग्राममध्ये ते धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन करतात. त्यांच्या पत्नी सौ. अस्मिता कटारिया धर्मशिक्षणवर्गामध्ये सहभागी होतात.

वर्ष २०१५ मध्ये नाशिक कुंभमेळ्यामध्ये श्री. कटारिया यांचा सनातन संस्थेशी संपर्क आला. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्मकार्य त्यांना आवडले अन् ते सनातनशी जोडले गेले. गुरुग्राममध्ये श्री. कटारिया यांच्या मालकीची ३ मंदिरे आहेत. त्यांच्या मंदिरांमध्ये ते धर्मशिक्षणवर्ग आयोजित करतात. त्यांच्या पुढाकाराने गुरुग्राममध्ये धर्मजागृती सभाही आयोजित करण्यात आली होती. ते त्यांच्या मंदिरात नियमित अन्नदान करतात. मंदिरांच्या उभारणीसाठी ते बराच पैसा खर्च करतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now