चांगली शिक्षणपद्धती आणि संस्कार यांचा अभाव, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांमुळे यंत्रमानवासारखा बेसावध, भावनाशून्य अन् निष्क्रीय बनत चाललेला सध्याचा समाज !

१. सद्यःस्थितीत जीवनाच्या यांत्रिकीकरणामुळे आजचा मानवही यंत्रमानवागत झाला असणे

‘आजकाल माणसे यांत्रिक झाली असून ती भावनाशून्य झाली आहेत. सध्याची शिक्षणपद्धती, जीवनशैली इत्यादींचे यांत्रिकीकरण झाले आहे. अलीकडच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपुढे माणसे यंत्रमानव (रोबोट्स) झाली आहेत. ही साधनयंत्रे आपल्याला यंत्रमानवासारखे असंवेदनशील, भावनाशून्य आणि निष्क्रीय बनण्यास शिकवतात.

२. सध्याच्या मुलांवर कोणतेच चांगले संस्कार होत नसून त्यांच्यापुढे चित्रपटांतील निरर्थक पात्रांचे आदर्श असल्याने ती वैज्ञानिक प्रयोगासाठी वापरली जाणारी ‘गिनी-पिग्स’ बनली असणे

सध्याची शिक्षणपद्धत मुलांना धनाभिमुख आणि धन बनवणारी यंत्रे बनवत आहे. मुलांवर कोणतेच संस्कार झालेले नसतात. आपली मुले दूरचित्रवाहिनी आणि चित्रपट यांतील निरर्थक पात्रांचे आदर्श समोर ठेवून त्यांचे अनुकरण करतात. प्रत्यक्षात हे तथाकथित आदर्श नमुने चारित्र्यहीन, राजसिक आणि तामसिक असतात. ते तामसिकतेविना काहीच शिकवत नाहीत. पैसे आणि प्रसिद्धी यांसाठी ते चारित्र्यासह सर्वकाही गमावतात. या इलेक्ट्रॉनिक जगतात ही मुले वैज्ञानिक प्रयोगासाठी वापरली जाणारी ‘गिनी-पिग्स’ बनली आहेत.

३. पालकांना मुले पैसे मिळवणारी यंत्रे म्हणून हवी असणे आणि त्यासाठी त्यांनी मुलांभोवती तणावपूर्ण वातावरण निर्माण करणे अन् मुलांवर चांगले संस्कार न करणार्‍या त्यांच्या माताच त्यांच्या भक्षक बनल्या असणे

आम्हाला शिकवले होते –

‘पैसे गमावले, तर काहीच गमावले जात नाही ।
आरोग्य गमावले, तर काहीतरी गमावले जाते ।
आणि चारित्र्य गमावले, तर सर्वच गमावले जाते ॥’

हा वाक्प्रचार आजकालच्या पालकांनाही ठाऊक नाही. पालकांना त्यांची मुले ‘पैसे मिळवणारी यंत्रे’ म्हणून हवी आहेत. मुलांनी अपेक्षित गुण मिळवले नाहीत, तर ते क्षुल्लक कारणांसाठीसुद्धा त्यांची तुलना इतरांशी करतात आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण करून त्यांचा छळ करतात. समाजामध्ये निर्माण झालेल्या अनपेक्षित वाईट परिस्थितीसाठी मुलांच्या मातांना दोषी ठरवले पाहिजे. मुलांवर चांगले संस्कार न केल्यामुळे माता नकळतपणे मुलांच्या रक्षक नव्हे, तर भक्षक बनल्या आहेत.

चांगले व्हा, चांगले करा; म्हणजे चांगले आपोआपच तुमच्यामागून येईल. जय गुरुदेव !’

– सौ. अंकिता कामत, मंगळूरू. (३०.८.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF