देशातील ८ राज्यांत असणार्‍या हिंदूंना अल्पसंख्यांक ठरवून त्यांना सुविधा कधी मिळणार ? – अखिल भारतीय संत समितीचे केंद्रातील भाजप सरकारला पत्र

५ कोटी मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या योजनेवरून प्रश्‍न

संत समितीला अशी मागणी का करावी लागते ? भाजप सरकार स्वतःहून यासाठी कृती का करत नाही ?

वाराणसी (उत्तरप्रदेश) – देशात अशी ८ राज्ये आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. या राज्यांत हिंदूंना अल्पसंख्य ठरवून त्यांना अल्पसंख्यांकांना मिळणारे अधिकार मिळणार आहेत का ?, असा प्रश्‍न वाराणसी येथील अखिल भारतीय संत समितीमधील साधू आणि संत यांनी विचारला आहे. अल्पसंख्यांकांच्या नावाखाली ५ कोटी मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध करतांना त्यांनी हा प्रश्‍न विचारला आहे. तसेच केंद्र सरकारला पत्र पाठवून अल्पसंख्यांकांची व्याख्या स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या ईदच्या वेळी केंद्र सरकारने ५ कोटी मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर समितीने पंतप्रधान, अल्पसंख्य कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि अल्पसंख्यांक आयोग यांना हे पत्र लिहिले आहे. त्यात ९ सूत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे.

अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती याविषयी म्हणाले की,

१. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘एक जन एक राष्ट्र’ असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यघटनेत अल्पसंख्यांक शब्दाची व्याख्या कुठेही नाही. डिसेंबर १९९२ मध्ये पहिल्यांदा काँग्रेस सरकारने अल्पसंख्यांक आयोगाच्या स्थापनेचा प्रस्ताव आणला होता. तो मूळ राज्यघटनेच्या धोरणाच्या विरोधात होता. त्यामुळे भारतात अल्पसंख्यांक कोण आहे, हा प्रश्‍न आहे.

२. भारतातील ८ राज्यांमध्ये (जम्मू-काश्मीर, मेघालय, मिझोराम, पंजाब, लक्षद्वीप, नागालॅण्ड, अरुणाचल प्रदेश आणि मणीपूर) हिंदू अल्पसंख्यांक आहेत. अडीच ते ३८ टक्क्यांपर्यंत तेथे हिंदू आहेत. या अल्पसंख्य हिंदूंनाही सरकारकडून दिल्या जाणार्‍या सुविधा मिळाल्या पाहिजेत.

३. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या काळात अल्पसंख्यांक आयोगाकडे मागणी केली होती की, राज्यवार अल्पसंख्यांकांची व्याख्या बनवून दाखवा. आम्हीही सरकारकडे हीच मागणी करत आहोत. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचा आम्हाला आनंद आहे; मात्र या ८ राज्यांतील हिंदूंनाही ती मिळाली पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF