कतरास, झारखंड येथील संतदांपत्य : गुरुकार्याचा ध्यास असलेले सनातनचे ७३ वे संत पू. प्रदीप खेमका आणि वात्सल्यभावाचे मूर्तीमंत रूप असलेल्या सनातनच्या ८४ व्या संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका !

प्रयागराज येथे कुंभपर्वामध्ये १६.२.२०१९ या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात झारखंड येथील सौ. सुनीता प्रदीप खेमका सनातनच्या ८४ व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. या कार्यक्रमात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, पू. प्रदीप खेमका, पू. नीलेश सिंगबाळ, तसेच अन्य साधक उपस्थित होते. या वेळी पू. प्रदीप खेमका, तसेच त्यांच्या पत्नी पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका यांच्या संदर्भात संत, तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

सनातनचे अद्वितीय संतदांपत्य पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार!

पू. प्रदीप खेमका यांच्याविषयी संत आणि साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘पू. खेमका यांना प्रत्येक क्षणी गुरुकार्याचा ध्यास असतो. त्यांनी सांगून ठेवले आहे की, सनातनच्या धर्मकार्यासाठी कोणत्याही साहाय्याची आवश्यकता असल्यास पहिल्यांदा मला सांगा. त्यांना कोणतीही सेवा सांगितली की, ती पूर्ण होतेच.

२. पू. नीलेश सिंगबाळ

‘पू. प्रदीप खेमका मोठे उद्योगपती असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नाही. ते रुग्णालयात असतांनाही ‘कुंभमेळ्यात सनातन संस्थेसाठी जागा मिळाली का ? काही साहित्य हवे आहे का ?’, याविषयी विचारणा करत.’

३. श्री. चेतन राजहंस

‘पू. प्रदीपभैय्या यांना कोणतीही सेवा सांगितली, तरी ‘हो जाएगा’, असेच त्यांचे उद्गार असतात. ते झारखंड येथे रहातात; पण गोव्यातील ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभागी होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांसाठी ते गोव्यातील त्यांच्या परिचितांकडून वाहन उपलब्ध करून देतात. हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांच्यासाठी ते प्रत्येक वर्षी प्रसादाचीही व्यवस्था करतात.’

साधकांवर मायेची पाखर घालणार्‍या, तसेच सदैव सकारात्मक आणि सहजतेने वागणार्‍या पू. (सौ.) सुनीता खेमका

१. आदर्श सहधर्मचारिणी

१ अ. ‘पू. प्रदीप खेमका यांना सेवा आणि साधना यांत साथ देणे : ‘पू. प्रदीप खेमका रुग्णाईत असतांना ‘गुरुदेवच त्यांची काळजी घेत आहेत’, असा पू. सुनीताभाभींचा भाव होता. प्रकृती ठीक झाल्यावर लगेचच पू. प्रदीपभैय्या प्रकृतीची चिंता न करता झारखंडहून प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या सेवेसाठी आले. गुरुदेवांवर असलेल्या नितांत श्रद्धेच्या बळावर पू. भाभींनीही त्यांना तेथे जाण्यापासून अडवले नाही.’ – (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे

१ आ. पू. भैय्यांची सर्वतोपरी काळजी घेणे : पू. सुनीताभाभी पू. भैय्यांची सर्वतोपरी काळजी घेतात. त्या पू. भैय्यांनी घ्यावयाची औषधेही मोजून ठेवतात. त्यामुळे त्यांनी औषधे घेतली नसल्यास पू. सुनीताभाभींच्या ते लगेच लक्षात येते. पतीशी इतकी एकरूप होणारी अशी अर्धांगिनी मी प्रथमच पाहिली.’ – कु. कृतिका खत्री, देहली

२. वात्सल्यभाव

२ अ. साधकांची काळजी घेणे : ‘पू. सुनीताभाभी आदर्श गृहिणी आहेत. त्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्रत्येक साधकावर लक्ष ठेवतात.’ – श्री. समरपाल सिंह, कतरास, झारखंड.

२ आ. प्रेमाने समजावणार्‍या पू. सुनीताभाभी कधी ‘आई, तर कधी ‘बहीण’ वाटतात ! : ‘प.पू. गुरुदेव निर्गुण रूपात सगळीकडे आहेत आणि पू. प्रदीपभैय्या अन् पू. सुनीताभाभी आमच्यासाठी गुरुदेवांचे सगुण रूप आहेत. पू. सुनीताभाभी आम्हाला कधी आईसारख्या वाटतात, तर कधी बहिणीसारख्या वाटतात. त्या आम्हाला प्रेमाने समजावतात, तर कधी आवश्यकता असल्यास रागावतातही. त्यांचे आमच्या पूर्ण कुटुंबाकडे लक्ष असते. त्यांच्या रूपात कतरासमध्ये गुरुदेवच आमच्यासाठी आले आहेत.’ – अधिवक्ता संजय अग्रवाल, कतरास, झारखंड.

२ इ. पू. सुनीताभाभींचा आधार वाटणे : ‘पू. भैय्या मला गुरुदेवांचेच रूप, तर पू. सुनीताभाभी मला मातेसमान वाटतात. आम्ही त्यांना आमच्या अडचणी मोकळेपणाने सांगतो. त्या आम्हाला समजावून सांगतात आणि साधनेचे दृष्टीकोन देतात. आम्हाला त्यांचा आधार वाटतो.’ – सौ. पिंकी केसरी, कतरास, झारखंड.

२ ई. ‘पू. सुनीताभाभी सर्व साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपतात. त्यांच्या सहवासात ठेवून शिकण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता!’ – श्री. शंभु गवारे, वाराणसी

३. सकारात्मक आणि सहजतेने वागणे

‘पू. सुनीताभाभी नेहमी सकारात्मक असतात. धनबाद येथे कोणतीही अडचण आली, तरी त्या आम्हाला त्यावरील उपाय सांगतात. त्या नेहमी सहजतेने वागतात.’ – रेणु सिंह, धनबाद

४. साधकांना प्रत्येक क्षणी दीपावली आहे !

‘आम्हाला पू. प्रदीप खेमका आणि पू. सुनीता खेमका हे संत मिळाले आहेत. दीपावली वर्षातून एकदाच येते; परंतु झारखंडमधील आम्हा साधकांसाठी प्रत्येक क्षणी दीपावली आणि आनंद आहे.’ – श्‍वेता चौधरी, कतरास, झारखंड

सनातनचे ७३ वे संत पू. प्रदीप खेमका यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत !

‘वर्ष १९९९ मध्ये मी गुरुदेवांच्या संपर्कात आलो आणि त्यांनीच माझ्याकडून साधना करून घेतली.

१. प.पू. गुरुदेवांनी रामनाथी आश्रमात वर्ष २००७ मध्ये साजरा केलेला विवाहाचा २५ वा वाढदिवस !

१ अ. वाढदिवसानिमित्त गुरु-शिष्याचे बोधचिन्ह असलेले पदक भेट मिळणे आणि त्यानंतर हे पदक एक क्षणही दूर न ठेवणे : १६.२.२०१९ या दिवशी आमच्या विवाहाला ३७ वर्षे पूर्ण झाली. वर्ष २००७ मध्ये ‘विवाहाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त प्रथेप्रमाणे मोठा सोहळा करण्यापेक्षा आम्ही रामनाथी आश्रमात गुरुचरणांजवळ जायचे’, असेे ठरवले. त्या वेळी गुरुदेवांनी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आश्रमातील सर्व साधकांना एकत्र बोलावून एक कार्यक्रम केला. त्या वेळी आम्हाला गुरु-शिष्याचे बोधचिन्ह असलेले पदक भेट दिले. त्यानंतर एक क्षणही मी हे पदक माझ्यापासून दूर ठेवले नाही. जीवनातील प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगी मला गुरुदेवांचे स्मरण होते.

१ आ. दुसर्‍या दिवशी छायाचित्रे काढतांना गुरुदेवांनी ‘ही छायाचित्रे संपूर्ण विश्‍वात जातील’, असे सांगणे आणि नंतर ती ग्रंथात छापली जाणे: नंतर दुसर्‍या दिवशी आमची छायाचित्रे काढली जात असतांना तेथे गुरुदेव आले आणि म्हणाले, ‘‘तुमची छायाचित्रे संपूर्ण विश्‍वात जातील !’’ त्या वेळी आम्हाला त्यांच्या बोलण्याचा भावार्थ लक्षात आला नाही. नंतर ग्रंथात आमचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर आम्हाला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला.

२. गुरुदेव आणि साधक यांच्याप्रती असलेला भाव

माझ्यावर गुरुदेवांची कृपा आहेच. गुरुचरणांची प्राप्ती झाल्यावर मला आता वेगळ्या व्यावहारिक शुभेच्छांची आवश्यकता वाटत नाही. साधक हे गुरूंचेच रूप असल्याने कोणत्याही साधकाविषयी माझ्या मनात प्रतिक्रिया येत नाही. एखाद्या साधकाचा भ्रमणभाष आल्यास मला गुरूंचाच भ्रमणभाष आल्यासारखे वाटते.

३. साधकांनी आध्यात्मिक उन्नती करून गुरुदेवांना आनंद द्यावा !

आपल्याला केवळ गुरुदेवांचे आज्ञापालन करायचे आहे. साधकांनी स्वतःतील स्वभावदोष न्यून करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘साधकांची साधना व्हावी’, असे गुरुदेवांना वाटते. साधकांची आध्यात्मिक उन्नती झाल्यावर गुरूंनाच अधिक आनंद होतो. साधकांनी गुरुचरणी समर्पित होऊन त्यांना शरण गेले पाहिजे.

‘पुढचा जन्म गुरूंच्या चरणांशी व्हावा’, हीच प्रार्थना आहे !’

– (पू.) प्रदीप खेमका, कतरास, झारखंड.

पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका यांच्यासंदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

१. आध्यात्मिक त्रास होत असतांना पू. सुनीताभाभींशी बोलल्यावर त्रास उणावणे

‘मला कधी आध्यात्मिक त्रास होत असल्यास मी पू. सुनीताभाभींशी बोलते. त्या वेळी मला ‘त्या श्री दुर्गादेवीचे रूप आहेत’, असे वाटून ‘त्यांच्याकडून क्षात्रभावाची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवते. त्यांच्याशी बोलल्यावर माझा त्रास उणावतो.’

– कु. कनक भारद्वाज, धनबाद, झारखंड.

२. पू. सुनीतादीदींच्या सहवासात नामजप आपोआप चालू होऊन ‘देहशुद्धी होत आहे’, असे जाणवणे

‘पू. सुनीता खेमकादीदी माझ्यासमोर आसंदीत बसल्या असतांना मला त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारची स्पंदने माझ्याकडे येत असल्याचे जाणवले. त्यामुळे ‘मला जांभया येऊन माझी देहशुद्धी होत आहे’, असे मला अनुभवायला आले. त्या माझ्या शेजारच्या आसंदीत बसल्यावर माझा नामजप आपोआप चालू झाला.’

– कु. गुलाबी धुरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.

३. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्याने स्थिर राहू शकणे

‘मी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो नसतो, तर माझे पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले असते. सर्वप्रथम माझी पत्नी संस्थेच्या संपर्कात आली. तिने अनेक अनुभूती घेतल्या. तिचे निधन झाल्यानंतर गुरूंच्या कृपेनेच मी स्थिर राहू शकलो. जीवनात अडचणी आल्यावर देवानेच आमच्यासाठी पुढील मार्ग उघडून दिले. मी आमच्या दुकानात असतांना मला पू. प्रदीपदादांचे येता-जाता जरी दर्शन झाले, तरी बरे वाटते.’ – श्री. सरजू केसरी, कतरास, झारखंड.

४. संतमूर्तींचे दर्शन झाल्यावर ‘गुरुदेव ब्रह्मदेव, तर अन्य संत म्हणजे प्रजापति, विष्णु, महेश आणि मीनाक्षी या देवता आहेत’, असे जाणवणे

‘गुरुदेव राम आहेत आणि पू. प्रदीपभैय्या हनुमान आहेत. साधकांच्या रूपात सर्व देव आले आहेत; पण त्यांना ओळखणे कठीण आहे. सर्व संतमूर्तींना पाहून वाटते की, ‘गुरुदेव ब्रह्मदेव असून सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका प्रजापति, पू. नीलेशदादा विष्णु, पू. प्रदीपदादा महेश, तर पू. (सौ.) सुनीताभाभी मीनाक्षी या देवतांच्या रूपात येथे आहेत. सर्व संतमूर्तींचे दर्शन हे कुंभमेळ्यातील खरे स्नान आहे. साधकांना कुंभस्नानाचा लाभ झाला आहे.’

– श्री. लोकेशरंजन सिंह, धनबाद, झारखंड.

जून २०१८ मध्ये पू. खेमका यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी त्यांची पत्नी आणि मित्र यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

  • ‘पू. प्रदीप खेमका हे कितीही कठीण परिस्थिती उद्भवली, तरी नेहमी सकारात्मक असतात, हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.’ – सौ. सुनीता खेमका
  • ‘वाल्याचा वाल्मीकि होतो. त्याप्रमाणे पू. प्रदीप खेमका यांच्यामध्ये साधनेमुळे परिवर्तन झाले आहे.’ – श्री. संजीवकुमार


Multi Language |Offline reading | PDF