पाकच्या विज्ञापनातून भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारख्या व्यक्तीचा वापर

पाकची भारतद्वेषी मानसिकता !

नवी देहली – पाकिस्तानच्या एका दूरचित्रवाहिनीने विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी एक विज्ञापन बनवले आहे. बालाकोट येथील एअर स्ट्राइकनंतर पाकच्या वायूदलासमवेत झालेल्या चकमकीच्या वेळी पाकने अटक केलेले भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचा या विज्ञापनात प्रतिकात्मक वापर केला आहे. ‘यंदाचा विश्‍वचषक आमचाच असेल’, असा संदेश या विज्ञापनातून देण्यात आला आहे. १६ जून या दिवशी भारत आणि पाक यांच्यामध्ये या स्पर्धेतील सामना होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर हे विज्ञापन बनवण्यात आले आहे.

१. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पितांना दाखवण्यात आली आहे. ७ फेब्रुवारीला अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने कह्यात घेतले होते. त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ते चहा पित असतांना दिसत होते. यावरूनच या विज्ञापनात याचा वापर करण्यात आला आहे.

२. या विज्ञापनामध्ये अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पित आहे. त्या व्यक्तीची चौकशी चालू आहे. ‘नाणेफेक जिंकल्यावर काय करणार?, कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळेल?’, असे प्रश्‍न त्या व्यक्तीला विचारण्यात आले. ‘मी हे तुम्हाला सांगू शकत नाही’, असे अभिनंदन यांनी चौकशीच्या वेळी दिलेले उत्तर या विज्ञापनामध्ये ही व्यक्ती देत आहे.

३. यानंतर विज्ञापनामधील अभिनंदन यांच्यासारख्या दिसणार्‍या व्यक्तीला तेथून जाण्यास सांगितले जाते. ती व्यक्ती चहाचा कप घेऊन तेथून जाऊ लागते. तितक्यात त्या व्यक्तीला ‘कप घेऊन कुठे चाललास?, असा प्रश्‍न विचारण्यात येतो.

४. या ठिकाणी चहाच्या कपचा आधार घेत विश्‍वचषकाविषयी सांगण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF