पत्रकाराचे समर्थन करता येत नसले, तरी अटक चुकीची असल्याने त्याची तात्काळ सुटका करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला आदेश

सामाजिक माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्यामुळे पत्रकाराला अटक

अनेकदा हिंदुत्वनिष्ठांना अशा प्रकारच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आली आहे; मात्र त्यांची कधी सुटका करण्याचा आदेश देण्यात आला, असे ऐकीवात नाही !

पत्रकार प्रशांत कनोजिया

नवी देहली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्या केल्याचा आरोप असलेले पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या अटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला फटकारले. न्यायालयाने म्हटले की, कनोजिया यांनी सामाजिक माध्यमांमध्ये आक्षेपार्ह पोस्ट करणे चुकीचेच आहे; मात्र त्यांच्या अटकेचे समर्थन करता येणार नाही. सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा आणि कनोजिया यांची तात्काळ सुटका करावी, असा आदेश दिला. तरीही संबंधित पत्रकाराविरोधात चौकशी करून न्यायालयात खटला दाखल करता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

१. न्यायालयाने पुढे म्हटले की, नागरिकांचे स्वातंत्र्य ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे.  तिच्याविषयी तडजोड होऊ शकत नाही. घटनेने या स्वातंत्र्याची हमी दिलेली असून तिचे उल्लंघन करता येणार नाही. राज्य सरकारने पत्रकाराला अटक करून त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे, जी कृती आम्ही मान्य करू शकत नाही.

२. ‘मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे’, असे सांगणार्‍या महिलेचा व्हिडिओ कनोजिया यांनी ट्विटर आणि फेसबूक यांवर शेअर केला होता. त्यावरून कनोजिया यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करून त्यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या विरोधात कनोजिया यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर ११ जूनला सुनावणी झाली.


Multi Language |Offline reading | PDF