हाँगकाँगमध्ये चीनच्या प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात १० लाख लोकांचे आंदोलन

नवी देहली – चीनच्या नव्या प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याला हिंसक वळण लागले. लोकांनी या कारवाईचा निषेध करण्यासाठी बाटल्या आणि दगड फेकले. या आंदोलनात १० लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. वर्ष १९९७ मध्ये हाँगकाँग चीनकडे हस्तांतर करण्यात आले होते. त्या वेळी या हस्तांतराला एवढ्या मोठ्या संख्येने विरोध करण्यात आला होता.

प्रत्यार्पण कायद्यात हाँगकाँमधील व्यक्तीवर चीनमध्ये खटला चालवण्यात आला, तर त्याला चीनकडे सोपवण्याची तरतूद करण्यात आली आहे. हाँगकाँगच्या नागरिकांचा याला विरोध असून हा कायदा रहित करण्याची ते मागणी करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF