(म्हणे) ‘न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने डॉ. झाकीर नाईक याला भारताकडे सोपवणार नाही !’ – मलेशियाचे पंतप्रधान

आतंकवादी झाकीर नाईक, तसेच देश लुटणारे निरव मोदी, मेहूल चोक्सी यांच्यासारख्या घोटाळेबहाद्दरांना देशात परत आणू न शकणे, हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे अपयश !

कुआलालंपूर (मलेशिया) – डॉ. झाकीर नाईक याला भारतात न्याय मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाणार नाही, असे विधान  मलेशियाचे पंतप्रधान महाथीर महंमद यांनी केले आहे. डॉ. झाकीर याच्यावर जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षांपासून डॉ. झाकीर भारतात आलेला नाही. सध्या तो मलेशियात वास्तव्य करत आहे. त्याला तेथील सरकारने संरक्षण दिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF